Shivsena Akola:शिवसेना तर्फे आधार कार्ड नुतनीकरण शिबिर

शिवसेना तर्फे आधार कार्ड नुतनीकरण शिबिर


अकोला: शिवसेना शहर प्रमुख अतुल पवनीकर व नगरसेवक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात विभाग प्रमुख प्रमोद धर्माळे यांनी शिवसेनेच्या वतीने मलकापूर ग्राम पंचायत कार्यालय येथे आधार कार्ड नूतनीकरण, नवीन आधारकार्ड बनविण्यासाठीचे शिबिर आयोजीत केले होते. 


६ सप्टेबर रोजी अतुल पवनीकर, मंगेश  काळे, गजानन बोराळे, केदार खरे, अविनाश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गजानन बोराळे यांचे आधार कार्ड अपडेट करून नागरीकांकरीता ही सुविधा उपलब्ध करुन दिली.जनतेनी व शिवसैनिंकानी याचा लाभ घ्यावा, असे प्रमोद धर्माळे यांनी यावेळी आवाहन केले. 



शिबिराला मलकापूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात आले.आधारकार्ड नूतनीकरण, दुरूस्ती करणे,नवीन कार्ड काढणे आदी सुविधा नागरिकांसाठी या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली.





टिप्पण्या