Search operation:अन चार तासाच्या शोध कार्यानंतर अखेर मिळाला त्याचा मृतदेह... His body was finally found after a four-hour search ...

अन चार तासाच्या शोध कार्यानंतर अखेर मिळाला त्याचा मृतदेह...


संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची यशस्वी कामगिरी 

His body was finally found after a four-hour search ...

कपारी असलेल्या 90 फुट खोल विहिरीत  70 फुट पाणी असल्याने सर्च ऑपरेशनला अडथळे निर्माण होत होते.

The search operation was hampered by the presence of 70 feet of water in an 90 feet deep well ...



अकोला: बेपत्ता असलेल्या रुपेश तायडे याचा शोध नातेवाईकांनी घेतला.गावातील एका विहिरीजवळ रुपेशची चप्पल आणि इतर सामान आढल्याने रुपेशने येथेच काहीतरी बरेवाईट केले असावे,असा नातेवाईकांना संशय आला.विहिरीत गळ टाकून त्यानी शोधले पण रुपेश आढळला नाही. अखेर त्यांनी पोलिसात तक्रार केली.पोलिसांनी रुपेशला शोधण्यासाठी तपास पथक नेमले.तसेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची मदत घेतली.शेवटी चार तासाच्या अथक प्रयत्नाला यश आले.रुपेशचा मृतदेह बचाव पथकाने विहिरीबाहेर काढला.



घटनाक्रम असा आहे की, रुपेश तायडे वय अंदाजे 30 वर्ष. राहणार देगाव ता.बाळापुर जिल्हा अकोला.  काल पासून घरून बेपत्ता होता. नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.आज येथील एका शेतातील विहीरी जवळ रुपेशची चप्पल आणि तंबाखूची पुडी  नातेवाईकांना दिसून आल्याने याच विहरीत रुपेशचा मृतदेह असल्याच्या संशयावरुन नातेवाईकांनी विहीरीत गळ टाकुन शोध घेतला. परंतू, काही मिळुन आले नाही. नंतर नातेवाईकांनी वाडेगाव पोलीस चौकीत धाव घेवून घटनेची माहिती दिली. 




लगेच वाडेगाव चौकीचे एपीआय पडघन  यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. लगेच जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी धीरज आटेकर, अंकुश सदाफळे, मयुर सळेदार, ऋषीकेश तायडे, ऋतिक सदाफळे, गोविंदा ढोके शोध व बचाव साहित्य तसेच रुग्णवाहिका घेवून घटनास्थळी दुपारी 3:30  वाजता पोहचले.  सर्च ऑपरेशन सुरू केले. 


कपारी असलेल्या 80 फुट खोल विहिरीत  70 फुट पाणी असल्याने सर्च ऑपरेशनला अडथळे निर्माण होत होते. शेवटी चार तासानंतर रुपेश तायडेचा मृतदेह सायंकाळी  6:45 शोधुन बाहेर काढण्यात आला.



यावेळी वाडेगाव पोलीस चौकीचे एपीआय पडघन, हेड.काॅ. रविंद्र अहेरकर, हेड. काॅ.नवलकार आणि  देगाव येथील शिवाजीराव म्हैसने, नातेवाईक तथा  गावकरी हजर होते. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

टिप्पण्या