Randheer Sawarkar:शेतकऱ्यांसाठी आमदार सावरकर करणार पुनःश्च उपोषण...

शेतकऱ्यांसाठी आमदार सावरकर करणार  पुनःश्च उपोषण...


अकोला :शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम २०१९ च्या रखडलेल्या पिक विमा अदायगीच्या विषयावर जिल्हाधिकारी व बँक यांनी दिलेले अभिवचन याची पूर्ती न केल्यास 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी आज पुन्हा दिला आहे.



पिक विमा योजनेचे पैसे भरल्यानंतर तसेच फरकाचे  रक्कम कौलखेड जहागीर व दहिगाव गावंडे या परिसरातील चोवीस गावांमधील ६६५ शेतकऱ्यांना पिक विमा मदत मिळाली नाही. या विषयावर आमदार रणधीर सावरकर यांनी ऊपोषणाचा इशारा दिल्यावर, जिल्हाधिकारी तसेच कृषी अधिकारी व बँक अधिकाऱ्यांनी अभिवचन देवून शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 सप्टेंबरपर्यंत रक्कम जमा करू, असे अभिवचन दिले होते, परंतू, त्या संदर्भात हालचाल दिसत नसल्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी पून्हा उपोषण आंदोलनाचा करणार असल्याचे  संकेत दिले.



जिल्हाधिकारी  तसेच राज्य शासन प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ मधील दहीगाव (गावंडे), कौलखेड  (जहांगीर), पळसो इत्यादी गावातील मंजूर विमा रक्कम पात्र शेतकऱ्यांना अति तात्काळ   प्रदान करण्यात यावी, अन्यथा  
२० ऑगस्ट २०२० पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरु करणार असल्याचे याआधी आमदार सावरकर यांनी प्रशासनास कळविले होते.मात्र,प्रशासनाने
१९ ऑगस्टला दिलेल्या लिखित आश्वासनाची अद्यापही पूर्तता न झाल्यास पुनश्च सोमवार २१ सप्टेंबर २०२० पासून पूर्ववत जिल्हाधिकारी  कार्यालासमोर उपोषण करणार असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले आहे.



खरीप हंगाम २०१९ मधील मंजूर असलेली प्रधानमंत्री पिक विमा राशी ६६५ शेतकऱ्यांना वितरीत न झाल्यामुळे दिनांक २० ऑगस्ट २०२० पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याबाबत रीतसर सूचना देण्यात आली होती.



या उपोषणाच्या संदर्भात नमूद पत्रानुसार  १८ सप्टेंबर २०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे  नमूद केले असले तरी  १० सप्टेंबर २०२० रोजी पर्यंत  विमा रक्कम विमा कंपनी कडून संबंधित शेतकऱ्यांचे खात्यात जमा करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबू नये, असे लीखित आश्वाषित केल्याप्रमाणे, प्रशासनाच्या  विनंतीचा आदर राखून तसेच कोविड-१९ च्या महामारीमुळे जन अरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने सदर उपोषण स्थगित करण्यात आहे होते. 



१० सप्टेंबर २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे खात्यात विमा रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे आपल्या प्रयत्नांची फलनिष्पती झाली किंवा कसे? ही बाब मात्र अनुत्तरीत आहे. या विषयाचे अनुषंगाने आपणास  सारासार  माहिती असून शेतकऱ्यांना तातडीने न्याय दृष्टीने शेतकऱ्यांचे खात्यात विमा रक्कम आश्वाशित  दिनांकापूर्वी जमा होण्याचे दृष्टीने तातडीचे प्रयत्न व्हावेत. प्रशासनाच्या लेखी आश्वाशित  विनंतीचा आदर करणे यथोचित असले तरी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची आपली सामुहिक व सार्वजनिक  भुमिका असावी.




तरी अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याच्या भूमिकेपासून परावृत्त होणे न्यायिक व नैतीकदृष्ट्या उचित नसल्याने सोमवार  २१ सप्टेंबर पासून नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, परिणामी उद्भवणाऱ्या संभाव्य  प्रसंगाची जबाबदारी शासनाची असेल सबब हीच पुन:श्च उपोषणाची सूचना समजण्यात यावे, निवेदनात नमूद केले आहे.

टिप्पण्या