online study:कस्तुरीची हाक... ऍड आनंदाणींची साथ ... अन रोशनीला मिळाला ऑनलाईन अभ्यासासाठी संगणक Kasturi's call ... Ad Anandani's support ... And Roshni got computer for online study

कस्तुरीची हाक... ऍड आनंदाणींची साथ ... अन रोशनीला मिळाला ऑनलाईन अभ्यासासाठी संगणक 

Kasturi's call ... Ad Anandani's support ... And Roshni got computer for online study



भारतीय अलंकार
अकोला: कोरोना  विषाणूच्या  प्रादुर्भावा मुळे सद्यस्थितीत शाळा महाविद्यालये बंद  आहेत. ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या  माध्यमातून विद्यार्थी  ज्ञानार्जन करित आहेत. परंतु ज्या निराधार व होतकरू  विद्यार्थ्यांजवळ संगणक , लॅपटॉप , अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यांची होणारी प्रताडणा टाळण्यासाठी समाजातील संवेदनशील व  दानदात्यांनी आपणाकडे  सुस्थितीत  असलेले संगणक , लॅपटॉप अथवा  मोबाईल अशा  गरजवंत  विद्यार्थ्यांना  दिल्यास त्यांची  मदतच  होईल. असे  आवाहन  काही  दिवसापूर्वी कस्तुरी सामाजिक संस्थेने  केले होते. त्यास  ऍड. कमल आनंदानी यांनी  कस्तुरीच्या  हाकेला  ओ  दिली.  ७ सप्टेंबर रोजी बेदरखेड  येथील होतकरू  व  गरजू विद्यार्थिनी  रोशनी  मोरेला  ऍड. कमल आनंदानी  यांच्या हस्ते त्यांच्या  रामदास पेठ  येथील कार्यालयात संगणक  संच  भेट  देण्यात  आला.


मीरा देशपांडे यांनी केली रोख मदत

रोशनीला  यावर्षी  SSC परीक्षेत ८२% गुण  मिळाले असून, ती शेतमजुरी करून  पुढील शिक्षण करण्यासाठी पैशाचा संचय  करीत आहे. तिच्या भावाची प्रकृती ठीक  नसल्याने त्याच्या औषधं उपचाराकरिता कस्तुरी च्या सदस्या मीरा देशपांडे यांनी  याप्रसंगी रु. २१००/- ची रोख मदत दिली.



 कमल आनंदानी यांचा सत्कार


कृतज्ञता भाव म्हणून कस्तुरीच्या वतीने  माजी आमदार वसंतराव खोटरे,डॉक्टर  शांताराम बुटे, प्रा.किशोर बुटोले व यशवंत  देशपांडे यांनी कमल आनंदानी यांचा शाल , श्रीफळ, पुष्प व स्मरणीका देऊन सत्कार  केला. तसेच रोशनीला देखील पुष्प व ड्रेस  देऊन तिचे ही अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी संजय गायकवाड यांनी निवेदन  केले.कार्यक्रमास राजेश्वर पेटकर, ऍड.दर्शना आनंदानी, मेघा कनकेकर,चेतना आनंदानी,  मीरा देशपांडे व रितेश सातव यांची  उपस्थिती लाभली. 


रोशनीच्या घरी पोहचला संगणक

कस्तुरीचे सदस्य राजेश्वर पेटकर आणि  संजय गायकवाड यांनी स्वतः मंगळवारी    रोशनी मोरेच्या गावी बेदारखेडा येथे  जाऊन संगणक पोहोचवून दिला.  


"आज रोशनी सोबत बोलल्या नंतर, तिला  भविष्यात सोबतच आहोत, असे आश्वस्त  केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर दिसणारा  आनंद व आत्मविश्वास, त्यामुळे खरा  परमार्थ घडला याची मनाला जाणीव  झाली. " 
                        प्रा. किशोर बुटोले
                              अकोला



(सोबत  कु.  रोशनी ,  आई ,  मामा ,    संजय  गायकवाड   व   राजेश्वर  पेटकर  सर  व रोशनीचे  घर  असलेले  छायाचित्र )

टिप्पण्या