- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व शुभेच्छा यांच्या जोरावर मी कोरोना विषाणू पासून मुक्त झालो आहे.
Nitin Gadkari defeated Corona virus
अकोला: केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना विषाणूचा पराभव केला आहे. ते कोरोना विषाणू पासून पूर्णपणे स्वस्थ झाले आहेत. गडकरी यांनी स्वतः बुधवारी ट्विटर मधून ही माहिती दिली.
आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व शुभेच्छा यांच्या जोरावर मी कोरोना विषाणू पासून मुक्त झालो आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. तुमच्या आपुलकीबद्दल धन्यवाद.,असे त्यानी ट्विट केले आहे.
१६ सप्टेंबरला नितीन गडकरी हे कोरोना व्हायरस चाचणी अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यावेळी नितीन गडकरी यांनी ट्विट केले की, "काल मला अशक्तपणा जाणवत होता आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझ्या तपासणी दरम्यान, माझा कोविड -१९ report चा अहवाल सकारात्मक आला. मी सध्या प्रत्येकाच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन ठीक आहे. मी स्वत: ला अलग केले आहे. मी सर्वांना विनंती करतो की जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी सावधगिरी बाळगून कोरोना टेस्ट करून घ्यावी.तसेच नियमांचे पालन केले पाहिजे,अशा आशयाचे त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती.
टिप्पण्या
Far chagale zale sir
उत्तर द्याहटवा