NEET EXAM:अकोला शहरात १९ तर अकोट मध्ये ३ ठिकाणी होणार NEET परीक्षा

अकोला शहरात १९ तर अकोट मध्ये ३ ठिकाणी होणार NEET परीक्षा


विद्यार्थ्यासाठी शहरातील प्रमुख  बस स्थानक  पासून केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी  व्यवस्था

जवळपास ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षात भाग घेणार


अकोला:१२ वी परीक्षा झाल्यानंतर वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्र सरकारने JEE व NEET ची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला परंतु कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शासनाने विरोध करून न्यायालयात याचिका दाखल केली सर्वोच्च व उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब  केल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री ना., रमेश पोकरीयाल व राज्यमंत्री ना संजयभाऊ धोत्रे यांचे मार्गदर्शनात देशभरात JEE ची परीक्षा यशस्वी होऊन योग्य प्रकारे नियोजन केल्यानंतर पालक व पाल्यांनी ना. धोत्रे यांचे व पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. १ सप्टें ६ सप्टें पर्यंत जीवन ची परीक्षा झाल्यानंतर १३ सप्टें रोजी NEET ची परीक्षा होत असून या संदर्भात अकोला जिल्हा भाजपाने केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे मार्गदर्शनात व त्यांचे सुचेनेनुसार जिल्हा भाजपा अध्यक्ष आ.रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात अकोला शहरात १९ ठिकाणी ही परीक्षा होत असून विद्यार्थ्यांना अडचण असल्यास त्यांच्या मदतीसाठी भाजयुमो व महिला आघाडी व भाजपा कार्यकर्त्यांचे एक पथक निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. 



NEET ची परीक्षा १३ सप्टें रोजी अकोला शहरात १९ ठिकाणी तर अकोट येथे ३ ठिकाणी होत असून जवळपास ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षात भाग घेणार आहेत.


परीक्षा केंद्र

यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अकोल्यात अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रभात किड्स, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान म महाविद्यालय, सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूल, डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, स्कूल ऑफ स्कॉलर्स, LRT कॉलेज, कार्मेल स्कूल, पोद्दार इंटर नेसनल स्कूल, सीताबाई कला महाविद्यालय, डॉ सुशीलाबाई देशमुख विद्यालय, मानव स्कूल ऑफ इंजिनिअरिंग AND टेक्नॉलॉजी,  राधादेवी गोएंका महिला महाविद्यालय, नोएल स्कूल, श्री समर्थ पब्लिक स्कूल,  जसनागर पब्लिक स्कूल, RLT विज्ञान महाविद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय येथे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. 




सध्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना येण्या जाण्यसाठी होणारा त्रास या बाबत भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रणधीर  सावरकर व महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी विविध सामाजिक संस्थांच्या व पक्षाच्या वतीने मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या व ज्यांचेकडे वाहन नाही अशा  विद्यार्थ्यासाठी शहरातील प्रमुख  बस स्थानक  पासून केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी  व्यवस्था करण्यात येत आहे.

टिप्पण्या