Corona update:*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात २० पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात २० पॉझिटिव्ह!


*आज  मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१९४*
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह- १७४*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व सहा पुरुष आहे. जूने शहर येथील दोन जण तर उर्वरित गौरक्षण रोड, शिवाजी नगर, मुर्तिजापूर, ज्योती नगर, सिसा ता.बार्शीटाकळी व नर्सिंग होस्टेल येथील रहिवासी आहे. 



दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६ जणांना, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथील पाच जण तर ओझोन  हॉस्पीटल येथून दोन जण अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.




*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३२४१+७३८+८६=४०६५*
*मयत-१५४*
*डिस्चार्ज- ३२५३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६५८* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या