Akola Police: अकोला पोलिसांच्या ‘नो मास्क नो सवारी’ या मोहिमेची गृहमंत्री यांच्याकडून दखल

अकोला पोलिसांच्या ‘नो मास्क नो सवारी’ या मोहिमेची गृहमंत्री यांच्याकडून दखल

Home Minister takes notice of Akola Police's 'No Mask No Ride' campaign


अकोला: कोरोना विषाणूचाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अकोला जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाव्दारे राबविण्यात येणारी ‘नो मास्क, नो सवारी’ व ‘नो मास्क, नो एन्ट्री’ या मोहिमेची दखल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेवून ही मोहिम राज्यात राबविण्याबाबत संबधिताना निर्देश दिले होते. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मोहिमची दाखल घेऊन आपल्या ट्विटर हँडल वर ट्विट करून अकोला पोलीस दलाचे कौतुक केले.अकोला पोलीस रावबीत असलेली मोहीम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यात म्हंटले आहे.

अकोला शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर पाहता प्रशासना सोबतच सर्व स्तरातील नागरिकांनी समोर येण्याची आवश्यकता पाहता, अकोला पोलिसांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहरात सर्व सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो डील ह्या सारखे उपक्रम सुरू केले.संबधीत संघटनेच्या सहकार्याने सर्व सामान्य नागरिकांना कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्रशासनाचे हातात हात देऊन पुढे येण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. 


त्याचाच एक भाग म्हणून अकोला शहरात धावणारे जवळ पास 2000 ऑटो वर नो मास्क नो सवारी चे पोस्टर्स लावण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी पाहिले दोन दिवस ऑटो चालकांची शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या अंतर्गत सर्व ऑटो चालकांनी स्वतः मास्क घालावे व ऑटो मध्ये प्रवास करणाऱ्या सवारी ला सुद्धा मास्क घालणे बंधनकारक करावे , सवारी मास्क घालण्यासाठी तयार नसल्यास अशी सवारी ऑटो मध्ये बसवून घेऊ नये.



 ह्या माध्यमातून स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. त्याला ऑटो चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, शहरात दररोज जवळपास 2000 ऑटो धावत असल्याने ह्या मधून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात,ह्या मोहिमेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना प्रबोधन करणे शक्य असल्याने ही मोहीम शहर वाहतूक शाखे कडून शहरात राबविण्यात येत आहे. 


दिलेल्या सुचनेचे पालन न करणाऱ्या ऑटो चालकांनी दंडात्मक कारवाईस तयार राहावे असा इशारा सुद्धा वाहतूक शाखेने दिला आहे, ऑटो चालकांना सूचना दिल्या नंतर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे उपस्थिती मध्ये ऑटो वर" नो मास्क नो सवारी" असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावणे सुरू आहे.


या पोस्टर्स साठी खंडेलवाल ज्वेलर्स व विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल ह्यांचे सहकार्य लाभले आहे. 

या मोहिमेची दाखल मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेऊन राज्यभर ही मोहीम राबिण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. आता या मोहिमेचे कौतुक अनिल देशमुख यांनी केले आहे.


 

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’  मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.  पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार प्रशासनाव्दारे जिल्ह्यातील प्रत्येक कुंटूबातील व्यक्तीचा डाटा संकलीत करण्याचे काम चालू आहे. 


 तसेच जिल्हा ,पोलीस आणि मनपा प्रशासन तर्फे  जनजागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.नो मास्क नो सवारी ही यामधीलच एक यशस्वी होत असलेली मोहीम आहे.

टिप्पण्या