Akola police:आजपासून अकोल्यात 'नो मास्क नो पेट्रोल डिझेल' मोहिम' No Mask No Petrol Diesel' campaign in Akola from today

आजपासून अकोल्यात 'नो मास्क नो पेट्रोल डिझेल' मोहिम

'No Mask No Petrol Diesel' campaign in Akola from today


*अकोला पोलीस आणि पेट्रोलियम डिलर्स अससोसिएशनचा संयुक्त उपक्रम


भारतीय अलंकार

अकोला: शहर आणि जिल्ह्यात कोविड 19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वारंवार आवाहन केले आहे व काही मार्गदर्शक तत्वे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे मार्गदर्शक तत्व म्हणजे घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळून मास्क परिधान करणे हे होय.पण, बरेच नागरिक मास्क न घालता गर्दीच्या ठिकाणी वावरतांना दिसतात. मात्र, यासमोर मास्क न घालता पेट्रोल पंपवर येणाऱ्या नागरिकांना पेट्रोल    व डिझेल मिळणार नाही.आज पासून अकोला शहरातील सर्व पेट्रोल पंपावर 'नो मास्क नो डिझेल' या मोहिमेची सुरवात केली करण्यात आली.  



पोलीस प्रशासन मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाया दररोज करतातच परंतु पोलिसांना इतरही अनेक कामे असल्याने पोलिसांची  नजर चुकवून बरेच नागरिक मास्क न घालण्यातच धन्यता मानतात, यासाठी लोकसहभाग व जनजागृती करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेवून पोलीस अधीक्षक अकोला जी श्रीधर यांच्या निर्देशा नूसार वाशिम - अकोला पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी  पुढाकार घेवून आज पासून अकोला शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो मास्क नो डिझेल या मोहिमेची सुरवात केली असून, त्याची सुरुवात अशोक वाटिका चौका जवळील वाजीबदार पेट्रोल पंपा पासून करण्यात आली.  



यावेळी वाशिम अकोला जिल्हा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नवीन प्रकाश ठाकूर, पदाधिकारी नरेश अग्रवाल, महेंद्र अग्रवाल, गुरुपाल नागरा, प्रभाजीत साहनी, हेमंत आनंदानी, राजेश चावला, दीपक म्हैसने, सुरेश वानखेडे, श्रीकांत रामटेके, व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके उपस्थित होते. ही मोहीम जिल्हाभर राबविणार असल्याचा मानस पेट्रोलियम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी  यावेळी व्यक्त केला

टिप्पण्या