- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola Education:अकोला एज्युकेशन सोसायटीतर्फे किशोर बुटोले यांचा सन्मान। Kishor Butole honored by Akola Education Society
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला एज्युकेशन सोसायटीतर्फे किशोर बुटोले यांचा सन्मान
Kishor Butole honored by Akola Education Society
प्रपंच करताना परमार्थ करावा
याप्रसंगी प्रा. किशोर बुटोले यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या स्थापना पूर्व पार्श्वभूमी पासून आजपर्यंतच्या प्रगतीची वाटचाल यावर प्रकाश टाकला व संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच सभासदांनी प्रपंच करताना थोडा परमार्थ करून आपणावर असलेले ईश्वऱी ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा आणि जीवन सार्थकी लावावे, असे विचार मांडले.त्याकरिता "कस्तुरी " ही सामाजिक संस्था आपली वाट बघत आहे, असेही ते पुढे म्हणाले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अनिरुद्ध क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले.अनिता कुळकर्णी यांनी मानपत्र वाचन केले. नम्रता भोकरदनकर यांनी विषयसूची नुसार संस्थेचे कामकाज पाहिले.
याप्रसंगी संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार देखील करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा अनिता कुळकर्णी यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या पुढील वाटचालीकरिता सभासदांकडून अपेक्षा व्यक्त केली. सभेचे संचलन व आभार प्रदर्शन छाया कुळकर्णी यांनी केले.तर सभेची सांगता ऋचा जयपूरकर यांच्या पसायदान गायनाने झाली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा