Akola Crime: डाबकी रोड येथे एका सदनिकेत आढळला कुजलेला मृतदेह ;परिसरात खळबळ। Rotten body was found in a flat at Dabki Road

डाबकी रोड येथे एका सदनिकेत आढळला कुजलेला मृतदेह ;परिसरात खळबळ

Rotten body was found in a flat at Dabki Road


अकोला: डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डाबकी रोड वरील प्रिया टॉवर अपार्टमेंट येथील एका सदनिकेत आज कुजलेल्या स्थितीत एका पुरुषाचा मृतदेह शनिवारी आढळला,अशी प्राथमिक माहिती मिळाली. 


ही बाब वाऱ्या सारखी पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.



प्रिया टॉवरच्या तिसऱ्या माळ्या वरील एका सदनिकेतून दुर्गंधी येत होती.परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असल्याने आणि संशयास्पद वाटल्याने ही बाब डाबकी रोड पोलिसांना सांगितली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.


पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला.सदर सदनिका आतून बंद असल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. आत जाऊन पाहिले असता,पोलिसांना एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.


पोलिसांनी चौकशी केली असता,हा मृतकाचे नाव प्रवीण विनायक कराळे असल्याचे समजले. मृतदेहाची अवस्था पाहून,दोन चार दिवसांपूर्वी इसमाचा मृत्यू झाला असावा,असा कयास पोलिसांनी लावला. पोलिसांनी सदनिकेची पाहणी केली असता, घातपात झाला असावा,अशी श्यक्यता वर्तवली.घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे त‌‌ज्ञ पोहचले.  सदर इसमाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला की,कुणी त्याची हत्या केली,का त्यानीच आत्मघात केला,असे अनेक प्रश्न बघेकरांच्या मनात उपस्थित झाले. अधिक तपास डाबकी रोड पोलीस करीत आहे.

टिप्पण्या