Workship:रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा-आमदार शर्मा

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा-आमदार शर्मा


अकोला: रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून, प्रभू रामचंद्रांना अभिप्रेत असलेले कार्य श्री रामनवमी शोभायात्रा समिती रामप्रसाद निधीच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक मदत करीत असते, असे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले. 


समितीच्या वतीने कॅन्सर रुग्णांना रामप्रसाद निधी अर्पण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विलास अनासने हे होते. 


यावेळी अशोक गुप्ता, डॉक्टर अभय जैन, ब्रिजमोहन चीतलांगे, नगरसेवक अजय शर्मा, गोपाल शर्मा, गोकुळ पोतले, योगिता पावसाळे, गणेश पावसाळे, धनंजय धबाले, आम्रपाली उपवट, मंगला सोनवणे, चंदा शर्मा, गिरीराज तिवारी, अनिल मानधने, अनिल थानवी, नवीन गुप्ता, मोहन गुप्ता, राम ठाकूर, नितीन जोशी, संदीप वाणी, बाळकृष्ण बिडवई, वसुधा बिडवई ,पद्मा अडचुले, कल्पना अडचुले, मनीषा भुसारी, पुष्पा वानखडे मीरा वानखडे ,रेखा नालट,  दुर्गा जोशी ,अमोल गोगे, गणेश अंधारे, संतोष पांडे ,विकी ठाकूर, निलेश ठेवा, बाळ टाले, सागर शेगोकार, सारिका जयस्वाल, एडवोकेट सुभाष ठाकूर, सिद्धार्थ शर्मा आदी उपस्थित होते.

 
कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले. प्रास्ताविक सतीश ढगे तर आभार प्रदर्शन मनीष बाछुका यांनी केले.

टिप्पण्या