Monsoon Alert:अकोल्यात अतिवृष्टीचा इशारा; काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले

अकोल्यात अतिवृष्टीचा इशारा; काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले


                               f i l e p h o t o


अकोला,दि.12: हवामान विभागनागपूर यांच्या संदेशानुसार रविवार (दि.16 ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीवारावादळविज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे


काटेपुर्णा प्रकल्पामध्ये बुधवार (दि.12) रोजी सकाळी सात वा. 85 टक्के पाणीसाठा जमा झाला असून  दुपारी 12.15 वा. चार गेट मधुन 96.44 घ.मि.प्र.से. याप्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पा क्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवुन प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविण्यात येईल. याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

यासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायकआरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.


मान्सून update

काटेपूर्णा प्रकल्प

आज दि. 12/08/2020 दुपारी 12.30 वा काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे प्रत्येकी 30से.मी.उघडून 96.44 घ.मी./सेकंद विसर्ग नदीपात्रात  सोडण्यात आला आहे.  पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 

-काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष






टिप्पण्या