- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अन त्यांनी लावली कलेक्टरच्या बंगल्यासमोर राखीची हातगाडी...
रक्षाबंधनच्या पुर्वसंध्येला रविवारी लॉकडाउन जाहीर केल्याचे निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या निवास स्थानासमोर राखी विक्रीची हातगाडी लावली.
अकोला : रक्षाबंधनच्या एक दिवस आधी अकोल्यात रविवार २ ऑगस्ट रोजी संपूर्ण लॉकडाउन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता. हे लॉकडाउन अमान्य करीत, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निवासस्थानी प्रवेशद्वारा समोर राखी विक्रीची हातगाडी लावून जिल्हा प्रशासनाने लावलेला लॉकडाउन अमान्य केला.
व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना महापालिका व पोलीस दादागिरी करीत दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचे तसेच दंड लावत असल्याचे समजले असता, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ते डॉ धैर्यवर्धन पुंडकर, गौतम गवई, कलिम खान,राजेश तायडे, सचिन शिराळे, बुद्धरत्न इंगोले, उमेश गोपणारायण,अतुल तेलमोरे, समीर भोजने, मुन्ना तायडे, अनवर शेरा, आकाश गवई यांनी रविवारी हे अभिनव आंदोलन केले.
जयहिंद चौक येथील दुकाने सुद्धा वंचितच्या पदाधिकारी यांनी सकाळीच सुरू केली. काही व्यापारी,व्यवसायिक,फेरीवाले यांनी या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देवून, दिवसभर आपली दुकाने,विक्री केंद्र सुरू ठेवून lockdown अमान्य केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा