ITI admission:आयटीआय (मुलींची) अकोलाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

आयटीआय (मुलींची) अकोलाच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ



21 ऑगस्ट अखेरची मुदत


अकोला : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोलाच्या ऑगस्ट 2020 सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, प्रवेश अर्ज ऑनलाईन करण्याची मुदत 21 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 


औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) हे महिलांकरिता राखीव असलेली हे जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील महिला मुली या संस्थेत प्रवेश घेऊ शकतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. 


इच्छुकांनी http//admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन प्राचार्य आर. टी. मुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेतील समुपदेशन केंद्राला सकाळी १० ते ११ या वेळेत भेट द्यावी, अशी माहिती संस्थेत शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पण्या