Heavy Rain: राज्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम;अकोल्यात अतिवृष्टीची शक्यता

राज्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम;अकोल्यात अतिवृष्टीची शक्यता


               


*मोर्णा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा


*काटेपुर्णा प्रकल्प ८९.८९ टक्के भरला




भारतीय अलंकार

अकोला,दि.१७: मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागात आजही पावसाचा जोर कायम आहे. येत्या चोवीस तासात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पश्चिम विदर्भात देखील अतिवृष्टी चा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभाग,नागपूर यांच्या संदेशानुसार गुरुवार २०ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. 


दरम्यान, जिल्ह्यातील मोर्णा प्रकल्पाने पाण्याची पातळी ओलांडली असून, काटेपुर्णा प्रकल्पामध्ये सोमवार (दि.17) रोजी सकाळी ८९.८९ टक्के पाणीसाठा जमा झाला. तसेच मोर्णा प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून इतरही प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये वाढ होत आहे. प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवुन प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.   याबाबत नदीपात्रा जवळील गावातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.


याबाबत संबधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहायक,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश देखील  पापळकर यांनी दिले आहेत.



मान्सून अलर्ट


*मोर्णा नदी  

२ दुपारी वाजता

उंची ७० से मी पातळी २६९ .३० विसर्ग १०१.०० कुमॅक्स



मोर्णा प्रकल्प 

संध्याकाळ ५ वाजता 

पातळी ३६६.९७ उ साठा ४१.४६

टक्केवारी  १००% साडवा १२ से मी विसर्ग १५.३७ कुमॅक्स



काटेपूर्णा प्रकल्प

आज दि. १७ ऑगस्ट रोजी काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे.  पाण्याची आवक पाहून नदीमध्ये पाणी सोडण्यात येईल.  पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 


काटेपूर्णा प्रकल्प 

आज  सायंकाळी ६ वाजता खडकपूर्णा प्रकल्पाचे  एकूण १९ वक्रद्वारे १ m ने उघडली असून नदीपात्रात ७१८०० क्यूसेकं (२०३३ cumec) एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील  नागरिकांनी  सावध राहावे. 

-खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


 काटेपूर्णा प्रकल्प

आज दि. 17/08/2020 सायंकाळी 6.30 वा काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे प्रत्येकी 30से.मी.उघडून 100.32 घ.मी./सेकंद विसर्ग नदीपात्रात  सोडण्यात आला आहे.  पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 

काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


मोर्णा नदी 7.00  वाजता सायंकाळ 

उंची 0.90से मी पातळी 269.50 विसर्ग 134.54कुमॅक्स



बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण 100 टक्के भरले

स्वयंचलित गोडबोले गेट चे अनेक दरवाजे आपोआप उघडले

बुलडाणा ते चिखली महामार्ग बंद


जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे

आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी:

नळगंगा : 41.51 दलघमी (59.88),

पेनटाकळी :49.58 दलघमी (82.67),

खडकपूर्णा :72.45 दलघमी (77.57),

पलढग : 4.51 दलघमी (60.51),

ज्ञानगंगा : 30.42 दलघमी (89.65),

मन : 33.68 दलघमी (91.45),

कोराडी : 14.87 दलघमी (98.35),

मस : 15.04 दलघमी (100),

तोरणा : 6.07 दलघमी (76.93)

व उतावळी : 19.79 दलघमी (100).



राज्यभरात पावसाची स्थिती


मुंबई रायगड, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जलाशयांच्या पाणी साठ्यात  वाढ झाली.मुंबई महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी कालपासून अधूनमधून  पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.


पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून आज देखील सकाळपासून चांगला पाऊस पडत आहे.  जिल्ह्यातला कवडास उनैयी बंधारा आणि वांद्री मध्यम प्रकल्प हे १०० टक्के भरलेत.


धामणी धरण हे ९६ टक्के  तर कुर्झे धरण हे ९० टक्के भरले आहे. सध्या जिल्ह्यातल्या सुर्या नदीची पाणी पातळी ५ मीटर, वैतरणा आणि पिंजाळ नदीची पाणी पातळी १०१ मीटर आणि पिंजाळ नदीची पाणी पातळी १०० मीटर इतकी आहे.

रायगड येथे पावसाच्या सरी चालू आहेत. जिल्ह्यातील सर्व नद्यांची  पाणी पातळी  इशारा पातळी पेक्षा खाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर ओसरला आहे. येथे सलग तीन दिवस पाऊस होता.


जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना आलेला पूर आता कमी झाला आहे. वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळून पाणी वाहत असल्याने चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावरची एकेरी वाहतूक काल दिवसभर सुरू होती. आज ती पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्ह्यात आज कोणत्याही ठिकाणी पूर परिस्थिती नाही. कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. याशिवाय जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका वाढला आहे. कोल्हापूर शहरातल्या काही भागात पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे.


आज पंचगंगा  नदीची पाणी पातळी ३७  फूट ७ इंच इतकी होती. पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट आणि  धोका पातळी – ४३ फूट इतकी आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यातल्या बारा तालुक्यांपैकी आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातले  ९४ बंधारे पाण्याखाली गेले  आहेत.


राधानगरी धरणाचे  ४ स्वयंचलित दरवाजे उघडले असून ७ हजार ११२ क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. तर वारणा धरणातून १४ हजार  ४८६ क्यूसेक्स, दूधगंगा धरणातून १२ हजार ९५० क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू आहे.


कर्नाटकमधल्या अलमट्टी धरणातून २ लाख ५० हजार  क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची आज पुन्हा कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबरोबर चर्चा करून अलमट्टीतून आणखी विसर्ग वाढवण्याची मागणी केली आहे. 


सातारा  जिल्ह्यात प्रामुख्याने धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातून ५५ हजार क्यूसेक इतके पाणी नादीपात्रात सोडण्यात येत आहे. नदी पात्र दुथड़ी वाहत असून पाटण, कराड आणि सांगली जिल्ह्यातील काही भागात पुरस्थिति निर्माण झाली आहे.


कोयना धरणातून तसेच जिल्ह्यातील कन्हेर, धोम, तारळी, उरमोडी या धरणातुन देखील नदी पात्रात विसर्ग सुरु आहे. सर्व धरणातील एकूण विसर्ग ७३ हजार क्यूसेक इतका असल्याने कृष्णा व  इतर उपनद्या धोका पातळीवर पोहोचल्या आहेत.


पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात ऐशी टक्के पाणीसाठा झाला असून पावसाची संततधार सुरू राहिल्यास बुधवार पर्यत चारही धरणे  शंभर टक्के भरतील अशी पाटबंधारा विभागाचे अभिंयता वामन भालेराव यांनी दिली. 


सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळ पासुनच ढगाळ वातावरण होते. सकाळी जिल्ह्यातील अनेक भागात हलका पाऊस पडला. तर गेल्या दोनतीन दिवसात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात खरीपाची पीके जोमात आहेत.


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जोरदार पाऊस होत असून भंडारदरा धरण भरल्यानंतर ४ हजार ३९९ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. या परिसरातील वाकी प्रकल्प भरला असून  १ हजार ५७४ क्युसेक्स वेगाने पाणी बाहेर पडत आहे.


भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात येत असून ७९ टक्के भरले आहे. या लाभक्षेत्रात सर्वाधिक पाऊस घाटघर  येथे  १२५ मिमी इतका झाला आहे. मराठवाड्यात अनेक भागात आजही पावसाची संततधार सुरू आहे. सुमारे आठवडाभरापासून सुरू असलेल्या या पावसामुळे जलाशयांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. 


हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या मधुमती नदीला पूर आला आहे. तर कयाधू नदीच्या पाणी पात्रातही मोठी वाढ झाली आहे. येलदरी धरणाचे दहा दरवाजे अर्ध्या मीटरने तर दोन दरवाजे एका मीटरने उघडून धरणातून सुमारे ७१५ घनमीटर प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातला शिवना टाकळी प्रकल्प सुमारे ९८ टक्के भरला असून, धरणातून ३६० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जालना जिल्ह्यात पहाटेपासून संततधार पाऊस सुरु आहे. पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या पावसामुळे काही भागात पिकांमध्ये पाणी साचले असून शेतीची कामे ठप्प झाली.


नांदेड जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे हिमायतनगर, माहूर, किनवट, भोकर या तालुक्यातल्या नदी नाल्यांना पूर आले आहेत. वाशिम जिल्ह्यात अधून मधून रिमझिम पाऊस सुरु आहे.  


गडचिरोली जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली; तरी भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर मात्र कायम आहे. पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी काल भामरागड गावात शिरले होते. गावातील आणि पुलावरील पाणी हळूहळू कमी होत आहे.


मात्र, सध्यातरी भामरागड-आलापल्ली मार्ग बंद असून, त्या परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. सिरोंचा तालुक्यातल्या सोमनपल्ली नाल्याला पूर आल्याने असरअली-सोमनपल्ली हा मार्ग बंद आहे.


कंबलपेठ नाल्याचा पूर ओसरल्याने जाफ्राबाद मार्ग, तसेच गडअहेरी नाल्याचा पूर ओसरल्याने अहेरी-गडअहेरी मार्ग सुरु झाला आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत.



टिप्पण्या