- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वऱ्हाडी कट्टातर्फै रविवारी डॉ. गणेश चंदनशिवे यांचा संवाद कार्यक्रम
अकोला: बाजीराव मस्तानी, तान्हाजी चित्रपटातील गाण्याचे पार्श्वगायक तसेच लोककला विभाग मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे हे वऱ्हाडी कट्टातर्फै फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात साहित्यिक, रसिकांसोबत संवाद साधणार आहेत.१६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
अल्पावधितच लोकप्रिय झालेल्या वऱ्हाडी कट्टा समूहातर्फे यंदा लॉकडाऊनच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना रसिक, साहित्यिकांचा प्रतिसाद लाभला. नामवंत साहित्यिकांनी कार्यक्रमास हजेरी लावून नवोदितांना मार्गदर्शन केले. नवोदित साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून वऱ्हाडी कट्टा समूहाने वऱ्हाडी मायबोलीचा गोडवा जपला आहे. कला, गायन क्षेत्रात भरारी घेतलेले प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे हे साहित्यिक, रसिकांसोबत संवाद साधणार आहेत. तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा