Corona virus:आणखी एक कोरोनाग्रस्त उपचार घेताना मृत्युमुखी...

आणखी एक कोरोनाग्रस्त उपचार घेताना मृत्युमुखी...




अकोला: सोमवारी दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 33 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 30 अहवाल निगेटीव्ह तर  तीन अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3251(2727+524) झाली आहे.  दिवसभरात 39 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 23943 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 23293, फेरतपासणीचे 172 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  478  नमुने होते. आजपर्यंत एकूण 23834 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 21107 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3251(2727+524)  आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज तीन पॉझिटिव्ह

 दिवसभरात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व एक पुरुष आहेत. त्यातील वाडेगाव, गुलजारपुरा व हिवरखेड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

एक मयत

दरम्यान  एकाचा मृत्यू झाला.  तो हिवरखेड ता. तेल्हारा येथील 72 वर्षीय पुरुष असून तो दि. 13 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

39 जणांना डिस्चार्ज

दरम्यान  दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16 जणांनाकोविड केअर सेंटर येथून नऊ जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून सात जण, हॉटेल रेजेन्सी येथून एक जण तर आयकॉन हॉस्पीटल येथून सहा जणांना अशा एकूण 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

420 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3251(2727+524)  आहे. त्यातील  136 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2695 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 420 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


Rapid Test

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. आज दिवसभरात झालेल्या 113 चाचण्यामध्ये  केवळ आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाअशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण,  बाळापूर, तेल्हारा व पातूर येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 34 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे 32 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे 34 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी  10 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आलाअशा प्रकारे दिवसभरात 113 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 10543 चाचण्या झाल्या असून 538 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेतअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे

टिप्पण्या