Corona virus update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ६५ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात ६५ पॉझिटिव्ह


*आज  सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३२६*
*पॉझिटीव्ह-६५*
*निगेटीव्ह- २६१*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष आहे. ते दोघही पिंपळखुटा, ता. पातूर येथील रहिवासी आहे. 

दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सस्ती ता. पातूर येथील ५७ वर्षीय पुरुष असून तो दि. १९ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४७ जणांना, कोविड केअर सेंटर येथून १० जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथील दोन जण, ओझोन  हॉस्पीटल येथून एक जण,  तर हॉटेल रेजेन्सी येथून एक जण, अशा एकूण ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३२२१+७२५+७८=४०२४*
*मयत-१५२*
*डिस्चार्ज- ३२३०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६४२* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रह!*

टिप्पण्या