Corona virus update:कोरोना अलर्ट*:अकोला:आज 2 पॉझिटिव्ह; 2 मृत्यू

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज 2  पॉझिटिव्ह; 2 मृत्यू

                                f i l e p h o t o

*आज शुक्रवार दि. २१  ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१२५*
*पॉझिटीव्ह- २*
*निगेटीव्ह- १२३* 

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन पुरुष असून ते नेहरु पार्क व कापसी अकोला येथील रहिवासी आहेत.

दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर नाका, जूने शहर, अकोला येथील ७४ वर्षीय पुरुष असून तो दि. १९ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर म्हैसपूर, ता.बार्शीटाकळी येथील ४२ वर्षीय महिला असून ती १७ ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला. 


दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २७९२+५६८=३३६०*
*मयत-१४३, डिस्चार्ज- २८८०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या