Corona virus update:आज 19 पॉझिटिव्ह :2 मृत्यू

आज 19 पॉझिटिव्ह :2 मृत्यू


 *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. 3 ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ५०*
*पॉझिटीव्ह- १९*
*निगेटीव्ह- ३१* 

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  सात महिला व १२ पुरुष आहेत. त्यात बाबुळगाव अकोला  येथील तीन जण, रेणुका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित कापसी, उमरी, सिव्हिल लाईन, घोडेगाव तेल्हारा, सहकार नगर, सुवर्णा नगर, पी एस मुख्यालय,  मूर्तिजापूर, लोहारा बाळापूर, डाबकी रोड, खदान व जवाहर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान दोघांचे मृत्यू झाले. त्यात ७० वर्षीय पुरुष असून ते दाळंबी अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. दोन ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला तसेच ५१ वर्षीय पुरुष असून ते लोहारा, बाळापूर येथील रहिवासी आहे. त्यांना दि. एक ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यांची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३३२+३६६=२६९८*
*मयत-११२, डिस्चार्ज- २१४६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४४०*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*


मान्सून अलर्ट

आज दि. 03/08/2020 रोजी सकाळी 11:30 वाजता खडकपूर्णा प्रकल्पाचे  एकूण 09 वक्रद्वारे 30 cm उघडली असून नदीपात्रात 10650 क्यूसेकं (302 cumec) एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 


खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष

टिप्पण्या