Corona virus news:आज आणखी 4 रुग्णांचा मृत्यू; अकोल्यात आतापर्यंत 3331 कोरोनाग्रस्त!

आज आणखी 4 रुग्णांचा मृत्यू; अकोल्यात आतापर्यंत 3331 कोरोनाग्रस्त!



अकोला,दि.19:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 137 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 119 अहवाल निगेटीव्ह तर  18 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3331(2776+555) झाली आहे. तर आज 4 रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.आज दिवसभरात 58 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजपर्यंत एकूण 24319 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 23607, फेरतपासणीचे 173 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  486  नमुने होते. आजपर्यंत एकूण 24186 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 21410 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3331(2776+555) आहेत.


आज 18 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील पाच जण, बार्शिटाकळी येथील दोन जण तर उर्वरित गौरक्षण रोड, गायत्री नगर, पिंजर ता.बार्शिटाकळी, राजणखेड ता.बार्शिटाकळी, हातगाव ता. मुर्तिजापूर व बेलखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भीम नगर, डाबकी रोड, अकोट व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

चार मयत

दरम्यान आज चार जणांचा मृत्यू झाला. त्यात गुलजारपुरा येथील 35 वर्षीय स्त्री असून ती दि. 16 ऑगस्ट रोजी दाखल झाली होतीतिचा उपचार घेतांना मृत्यू झाला, कोठारी पैलपाडा येथील 65 वर्षीय पुरुष असून तो दि. 10 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, बेलखेड, ता. तेल्हारा येथील 82 वर्षीय पुरुष असून तो दि. 17 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर रायखेड, ता.तेल्हारा येथील 70 वर्षीय पुरुष असून तो दि. 16 जुलै रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

58 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17 जणांनाकोविड केअर सेंटर येथून तीन जण, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाच जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजीन्सी येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून 22 जण तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून आठ जणांना अशा एकूण 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

373 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3331(2776+555)  आहे. त्यातील  141 जण मयत आहेत. स्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2817 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 373 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


Rapid Test


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 127 चाचण्यामध्ये  10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाअशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीणपातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 27 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर  येथे 24 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे 40 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी  23 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे एक चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशा प्रकारे दिवसभरात 127 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 10855 चाचण्या झाल्या असून 570  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत


टिप्पण्या