Corona update:*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात २९ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात २९ पॉझिटिव्ह


*आज  शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३३१*
*पॉझिटीव्ह- २९*
*निगेटीव्ह- ३०२*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात  तीन महिला असून त्या व्याळा येथील दोन तर कान्हेरी  येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. त्यात बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो दि. २० ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.  तर ओझोन हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला असून ते रामदास पेठ येथील ७६ वर्षीय पुरुष असून त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर  येथून तीन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून १० जण, अशा एकूण २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 


 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३०९१+६८८+५७=३८३६*
*मयत-१५१*
*डिस्चार्ज- ३१४४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५४१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
०००००

टिप्पण्या