BJP: संजय कुटे यांच्या नेतृत्वात शेगाव येथे गजानन महाराज मंदिरासमोर घंटानाद

संजय कुटे यांच्या नेतृत्वात शेगाव येथे  गजानन महाराज मंदिरासमोर घंटानाद 

भाजपचं मंदिरं सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन


'दार उघड, उद्धवा दार उघड'ची घोषणाबाजी


श्री संत गजानन महाराज मंदिरासमोर केले घंटानाद 

शेगाव : भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी आज भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, अकोला, बुलढाणा जिल्यातही हे आंदोलन पार पडले. संत नगरी शेगावात श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरासमोर या भागाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात तर खामगावात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार एड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. 



यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद आंदोलन केलं. यावेळी ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. मात्र, भाजपने मंदिरं सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे.



टिप्पण्या