- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सरकारचा दुजाभाव... खासगी वाहनासाठी अटी कायम,अटी रद्द कराव्या-भाजप
अकोला: राज्य शासनाने जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा एसटी बस सुरू केली. परंतू यामध्ये दुजाभाव केेला. खासगी वाहनांसाठी ई पास अट कायम ठेवली, हे अन्यायकारक असून जनतेमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या असल्याने सरकारने अट रद्द करावी, अशी आग्रही मागणी आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.
शासन हे गोंधळलेले व तीन चाकी सरकार असल्यामुळे वेगवेगळ्या विचाराने निर्णय घेण्याची क्षमता असलेला हे सरकार असल्याच्या या कृतीने सिद्ध होत असल्याचा भाजपाने आरोप केला आहे.
ई पास नियमावली रद्द करावी. प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जाण्यासाठी कायम ठेवावी . एस टी बस सुरू करताना सरकारने जे नियम लागू केले तेच खासगी वाहनांसाठी सुद्धा करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा भाजपाने केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा