Against Lockdown:लॉकडाउनच्या विरोधात 'वंचित'चे डफडे बजाव आंदोलन

लॉकडाउनच्या विरोधात 'वंचित'चे  डफडे बजाव आंदोलन


लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरणार !

पुणे:  केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर बुधवारला दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे ,अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी  केली आहे.


 हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलंय.  या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावे असे ही प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.  

अकोल्यातही डफडे वाजणार


वंचित बहुजन आघाडी अकोलाच्या वतीने  
*डफळे बजाव आंदोलन*

*बुधवार, १२ऑगस्ट २०२०*

*वेळ दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत*


केंद्र व राज्य सरकार ने कोरोनाचे नावावर कुलूपबंद  लोकशाही कुलूपबंद केली आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू करण्यात यावे ह्या मागणी करीता एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे आदेशानुसार आंदोलन.

*स्थळ*
नवीन बस स्टँड समोर
*नेतृत्व*
वंचित बहुजन आघाडी 
अकोला जिल्हा 

*स्थळ*
जुने बस स्टँड 
*नेतृत्व*
वंचित बहुजन महिला आघाडी

*स्थळ*
डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह समोर
*नेतृत्व*
महानगर पुर्व वंचित बहुजन आघाडी 

*स्थळ*
महानगर पालिका समोर
*नेतृत्व*
महानगर पश्चिम वंचित बहुजन आघाडी 

*स्थळ*
एस टि विभागीय कार्यालय,मंगरुळपिर रोड
*नेतृत्व*
सम्यक विद्यार्थी आंदोलन 

 डफळी बजाव आंदोलन यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, 
वंचित बहुजन महिला आघाडी,
सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या जिल्हा, महानगर, अकोला तालुक्यातील
सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.तसेच
इतर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तालुकास्तरावर बस डेपो समोर डफळे बजाव आंदोलन 
यशस्वी करावे, असे आवाहन प्रमोद देंडवे
जिल्हाध्यक्ष वंचित बहूजन आघाडी अकोला यांनी केले आहे.




टिप्पण्या