Youth congress:युवक काँग्रेस प्रदेश चिटणीसपदी निनाद मानकर यांची फेरनिवड

युवक काँग्रेस प्रदेश चिटणीसपदी निनाद मानकर यांची फेरनिवड
अकोला: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या नुकताच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अकोट येथील निनाद संजय मानकर यांची  महाराष्ट्र प्रदेशचिटणीस पदी फेरनिवड  केली आहे.

निनाद  मानकर हे  दहा वर्षांपासून एन.एस .यु.आय व युवक काँग्रेसच्या चळवळीत असून, त्यांनी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी हिताचे कार्य केले. अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. पक्षाच्या विविध उपक्रमामधे सहभागी होते. त्यांचा प्रवास विद्यार्थी दशेत झाला. काँग्रेस महाविद्यालयीन अध्यक्ष ते महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस व आता अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशचिटणीस असा राहिला आहे. 
निनाद मानकर  हे  विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी असतांना, त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी ते विद्यापीठ छात्रसंघ सचिव पदाच्या निवडणुका त्यांनी जिकल्या. वर्षभरापासून प्रदेशसचिव पदी सुध्दा चांगले उपक्रम राबविले. अनेक समाजोपयोगी कार्य केले त्याचे कार्य बघून सत्यजित तांबे यांनी त्यांची प्रदेश सचिव पदी फेर निवड केली. 

निनाद मानकर यांच्या नियुक्तीने सर्व मित्र मंडळात आनंदाचे वातावरण असून, सर्वांकडून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
.........

टिप्पण्या