Youth Congress:प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी सागर कावरे

प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी सागर कावरे

अकोला: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव पदी सागर कावरे यांची नियुक्ती  प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे

२०१८ मधे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची निवडणुक पार पडली.त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पदी सत्यजीत तांबे यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रामधे युवक काँग्रेसच्या प्रदेश, जिल्हा तथा विधानसभा स्तरावर युवा कार्यकर्ते निवडून आले. त्यावेळी अकोल्यामधुन सागर कावरे सुद्धा प्रदेश सचिव पदी निवडून आले होते. तेव्हापासुन त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे तथा पक्षाच्या वतीने विविध जबाबदारी देण्यात आली. 

यामध्ये अमरावती जिल्हा प्रभारी,नागपुर जिल्हा प्रभारी तसेच लोकसभा निवडणुक दरम्यान धुळे लोकसभा मधे सुद्धा युवक काँग्रेस प्रभारी म्हणुन जबाबदारी देण्यात आली होती. त्या संपूर्ण जबाबदारी त्यांनी अतिशय प्रामणिकपणे पार पाडल्या.

कावरे हे सध्या अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी म्हणुन कार्यरत आहेत. यापुर्वी अकोला एन.एस.यु.आय. अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी यशस्विरित्या सांभाळली. जिल्हा युवक काँग्रेसच्या महासचिव पदी, सनियंत्रण समिति जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सागर कावरे पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव पदी नियुक्ति करून पदोन्नती केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी जो विश्वास माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्या वर विश्वास टाकला त्याबद्दल आभारी आहो. तसेच काँग्रेस पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवित आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी, बाळासाहेब थोरात, यशोमतीताई ठाकुर,सत्यजितदादा तांबे यांचे हात बळकट करण्यासाठी सदैव कार्यरत राहणार अश्या शब्दात कावरे यांनी आपली भावना व्यक्त केल्या.
.........

टिप्पण्या