Road Accident:मूर्तिजापूर जवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार ठार, तीन गंभीर

मूर्तिजापूर जवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार ठार, तीन गंभीर



नागोली-नागठाणा गावाजवळ घडला अपघात

अपघातात 2 चिमुकले जागीच ठार


अकोला: नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या  कारला मूर्तिजापूर तालुक्यातील नागोली-नागठाणा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की,कार मधील प्रवासी अक्षरशः बाहेर फेकल्या गेले. या अपघातात ४ ठार तर ३ गंभीर जखमी आहेत.हा अपघात सोमवार २० जुलै रोजी दुपारी घडला.


नागपूर कडून मुंबईकडे MH-04 BW-5259 ही कार जात होती.नागठाणा गावाजवळ समोरून भरघाव येणाऱ्या MH-15 FV-1413 क्रमांकाच्या ट्रकने कारला जबर धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की,कारचा समोरचा भाग चकनाचूर झाला. कार मधील बुराउद्दीन दिलावर (वय 35),फातिमा दिलावर (वय 50), (दोन्ही राहणार नाशिक) यांच्यासह असलीम (वय 4),बुराहनुद्दीन(वय 6 महिने) हे चोघे ठार झाले.सबिया हुसेन(30), हबीब मोहम्मद हुसेन (35)आणि हुसेन गुलाम हुसेन (वय50) (तिघेही रा.मुंबई) हे गंभीर जखमी  झाले. जखमींना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र,त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.



वाहतूक झाली ठप्प

कार आसनी ट्रक मधील ही धडक एवढी जोरदार होती की,कारमधील प्रवासी अक्षरशः कार बाहेर फेकल्या गेले. यामधील दोन्ही चिमुकले घटनास्थळीच ठार झाले.तर एक महिला व एक पुरुष दवाखान्यात नेतेवेळी मरण पावले.  वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या रुग्णवाहिकेतून जखमी व मृतकाना रुग्णालयात आणण्यात आले. हा अपघात दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून कायदेशीर सोपस्कार पार पाडले. वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालकाविरुद्ध भांदवि व मोटार वाहन अधिनियम नुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले.

***(**

टिप्पण्या