Politics:'प्रहार'च्या कार्यकर्त्यांना डावलून भाजपशी सलोखा; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष Reconciliation with BJP by defeating 'Prahar' activists; Intense resentment among activists

अर्थातच राजकारण:गल्ली ते दिल्ली
            

'प्रहार'च्या कार्यकर्त्यांना डावलून भाजपशी सलोखा; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष 
Photocaption: बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे जिल्हाधिकारी कार्यालय चौकात लागलेले हेच ते बैनर ज्यावर स्व.पुंडकर यांचा फोटो नाही.

* वाढदिवसाच्या बॅनरमुळे आंतरिक कलहात ठिणगी पडली

नीलिमा शिंगणे-जगड
अकोला, दि.६ : प्रहारच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री पद मिळाले. त्यात अकोल्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने अकोल्यातील प्रहार कार्यकर्त्यांच्या आशा पल्लविल्या. मात्र, बच्चू कडू यांचे विशेष कार्यधिकारी सुनील पाटील हे प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलून 'भाजप'च्या कार्यकर्त्यांशी सलगी वाढवत आहे. त्यांना वेळ देत आहेत. मात्र, प्रहारच्या कार्यकर्त्यांना साधे विचारलेही जात नसल्याचा आरोप प्रहारच्या आतल्या गोटात सुरू आहे. या घटनेमुळे भविष्यात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यातून नावारूपास आलेला प्रहार जनशक्ती पक्ष हा बच्चू कडू च्या अखंड संघर्षातून आज राज्याच्या विविध भागात विस्तारला. निष्ठावंत कार्यकर्ते प्रहारच बळ. बच्चू कडू हे २००४ पासून अचलपूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कडू यांनी अखंड परिश्रम घेऊन राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरिबांची प्रश्न, सामान्य नागरिकांचे प्रश्न, रुग्णसेवा यावर भर दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून बच्चू कडू यांना जनमानसात मोलाचे स्थान आहे. हेच स्थान पाहता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांना 'महाविकास' आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पद बहाल केलं. अकोल्याचे पालकमंत्री पदही दिलं. त्यामुळे प्रहार कार्यकर्त्यांच्या आशा पल्लविल्या.  प्रहार'ची काम अधिक झपाट्याने होतील. सत्तेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची, गोरगरिबांचे काम ताकदीने केल्या जातील, त्यांचे प्रश्न निकाली निघतील, अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र अकोल्यातील बच्चू कडू यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील यांच्यामुळे कार्यकर्त्यांच्या या आशेवर विरजण पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफूस पहायला मिळत आहे. सुनील पाटील प्रहार च्या कार्यकर्त्यांना डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांशी सलगी वाढवीत आहेत. त्यांना आपल्या दालनात तासन्तास वेळ दिला जात आहे. मात्र अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून प्रश्न, समस्या  मांडणाऱ्या प्रहारच्या सामान्य कार्यकर्त्यांना साधे विचारलं ही जात नाही, असा आरोप आता प्रहारच्या अंतर्गत गोटात सुरू झालाय. त्यामुळे भविष्यात या बाबीचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी दर्शवली आहे. सुनील पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत असलेली सलगी यामुळे प्रहार संघटनेचे बिघडणार वातावरण याकडे आता बच्चू कडू यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

*स्व.पुंडकरांचा प्रहारला विसर* 

अकोला जिल्ह्यात पडतीच्या काळात प्रहार जनशाक्ति पक्षाचा झेंडा अकोटच्या स्व.तुषार पुंडकर यांनी खांद्यावर घेतला. अलीकडेच जुन्या वैमनस्यातून फुंडकर यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री झाल्यावर बच्चू कडू यांचा पाच जुलै रोजी विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी वाढदिवसाची बॅनर ही लावण्यात आली. मात्र, अनेक बॅनरवर स्व.तुषार पुंडकर यांचा फोटो नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. 'कार्यकर्ता मेला म्हणजे त्याचे विचारही संपले, असं नवं समीकरण स्वाभिमानी प्रहार'मध्ये आता आकाराला येत असल्याचे दिसून येत आहे.
.........

टिप्पण्या