Google playstore::तुमच्याही मोबाइल मध्ये आहेत का हे अप्स; गुगल प्ले स्टोअरने हटविले २५ अप्लिकेशन

तुमच्याही मोबाइल मध्ये आहेत का हे अप्स; गुगल प्ले स्टोअरने हटविले २५ अप्लिकेशन


फेसबुक लॉगइनची माहिती चोरत होते हे ऍप्स 

अकोला: गुगलने जवळपास २५ अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर वरून हटवले आहेत. हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांचा फेसबुक लॉगइनचा तपशील चोरत असल्याची माहिती समोर आले. ही माहिती समोर येताच गुगलने तातडीने  पाऊल उचलून वापरकर्ताला हानिकारक ठरत असलेले जवळपास २५ अँप्लिकेशन काढून टाकले. 


एविना सायबर सिक्युरिटी फर्मनं याबद्दल गुगलला सतर्क केले होते,हे येथे उल्लेखनीयआहे .यानंतर  गुगलने तातडीने कारवाई करीत संबंधित अ‍ॅप्स प्ले स्टोअर वरून हटवले. प्ले स्टोअर वरून काढून टाकण्यात  आलेल्या अ‍ॅप्समध्ये एक मालवेअर आहे. त्या माध्यमातून वापरकर्त्याच्या फेसबुक लॉगइन डिटेल्सची नोंद ठेवली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने हे अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक असल्याचे सायबर अभ्यासकांच्या लक्षात आले. हे २५ अ‍ॅप्स जवळपास २० लाख लोकांनी डाऊनलोड केले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये यापैकी कोणतेही अ‍ॅप्स असल्यास ते तातडीनं डिलीट करा,असे सायबर क्राइम एक्सपर्टसचे म्हणणे आहे.


खालील यादीत पहा ...कोणते अ‍ॅप्स आहेत जे गुगलने प्ले स्टोरवरून हटवले आहेत.

१. सुपर वॉलपेपर्स फ्लॅशलाइट्स (Super Wallpapers Flashlight)- ५ लाख डाऊनलोड

२.  पेडेनटेफ (Padenatef)- ५ लाखांहून अधिक डाऊनलोड

३. वॉलपेपर लेवल (Wallpaper Level)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड

४. कॉन्टूर लेवल वॉलपेपर (Contour level wallpaper)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड

५. आयप्लेयर अँड आयवॉलपेपर (Iplayer & iwallpaper)- १ लाखांहून अधिक डाऊनलोड

६. व्हिडियोमेकर (Video maker)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड

७. कलर वॉलपेपर्स (Color Wallpapers)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड

८. पेडोमीटर (Pedometer)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड 

९. पावरफुल फ्लॅशलाइट (Powerful Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड

१०. सुपर ब्राइट फ्लॅशलाइट (Super Bright Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड

११. सुपर फ्लॅशलाइट (Super Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड

१२. सॉलिटायर गेम (Solitaire game)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड

१३. एक्युरेट स्कॅनिंग ऑफ क्यूआर कोड (Accurate scanning of QR code)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड

१४. क्लासिक कार्ड गेम (Classic card game)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड

१५. जंक फाइल क्लीनिंग (Junk file cleaning)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड

१६. सिंथेटिक झेड (Synthetic Z)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड

१७. फाइल मॅनेजर (File Manager)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड

१८. कम्पोझिट झेड (Composite Z)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड

१९. स्क्रीनशॉट कॅप्चर (Screenshot capture) - १० हजारांहून अधिक डाऊनलोड

२०. डेली होरोस्कोप वॉल पेपर्स (Daily Horoscope Wallpapers)- जवळपास १० हजार डाऊनलोड

२१. वॉक्सिया रीडर (Wuxia Reader)- जवळपास १० हजार डाऊनलोड 

२२. प्लस वेदर (Plus Weather)- जवळपास १० हजार डाऊनलोड

२३. एनाइम लाईव्ह वॉलपेपर (Anime Live Wallpaper)- जवळपास १० हजार डाऊनलोड

२४. आय हेल्थ स्टेप काऊंटर (iHealth step counter) 

२५. कॉम टाइप फिक्शन (Com type fiction)

……...

टिप्पण्या