Corona virus news:अकोल्यात कोरोनाची वाटचाल दोन हजाराकडे...

अकोल्यात कोरोनाची वाटचाल दोन हजाराकडे...
अकोला: अकोल्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या 1959 झाली असून,दोन हजार पूर्ण करण्यासाठी वाटचाल करीत आहे.ही बाब भूषणावह निश्चितच नाही.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अकोलेकरांना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

गुरुवारी 16 जुलैला दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 474 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 458 अहवाल निगेटीव्ह तर 16 अहवाल पॉझिटीव्ह आले.आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1959(1938+21) झाली आहे. दिवसभरात 10 रुग्ण बरे झाले. तर एकाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 220 जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 15716 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 15244, फेरतपासणीचे 158 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 314 नमुने होते. आजपर्यंत एकूण 15630 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 13692 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 1959(1938+21)आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

 16 पॉझिटिव्ह
गुरुवारी दिवसभरात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  सकाळी प्राप्त अहवालात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 14 पुरुष व दोन महिला आहेत. त्यात त्यात मुर्तिजापूर येथील सहा जणअकोट येथील पाचजेतवन नगर येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चारही पुरुष असून ते बोरगांव मंजू येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

10 जणांना डिस्चार्ज
दरम्यानआज दिवसभरात कोविड केअर सेंटरमधून सात,आयकॉन हॉस्पिटल येथून तिन अशा 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
एकाचा मृत्यू
दरम्यान गुरुवारी एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण करोलीचोहटा बाजारता.अकोट येथील ८२ वर्षीय पुरुष असून तो दि. ११ जुलै रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झालाअशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

220 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण 1959(1938+21) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील 99 जण (एक आत्महत्या व 98 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 1640 आहे. तर सद्यस्थितीत 220 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
.........

टिप्पण्या