Corona virus news:अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2524

अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2524 


अकोला: बुधवारी,29 जुलै रोजी दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 254 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 226 अहवाल निगेटीव्ह तर  28 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2524(2224+300) झाली आहे. दिवसभरात 23 रुग्ण बरे झाले. आता 366 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 19056 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 18507, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  382  नमुने होते. आजपर्यंत एकूण 18985 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  16761   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2524(2224+300)आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
 28 पॉझिटिव्ह
दिवसभरात 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले सकाळी 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  नऊ महिला व 10 पुरुष आहेत. त्यातील अकोट येथील 15 जण तर उर्वरित दगडीपूल, बांबुळगाव, पांढरी व राणेगाव तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व आठ पुरुष आहेत. त्यात  आलेगाव पातूर येथील दोन जण, बोंदरखेड, गोलाबाजार, हिंगणा रोड, जीएमसी, रौनक मंगल कार्यालय, मुर्तिजापूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

23 जणांना डिस्चार्ज
दरम्यान  दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जणांनाकोविड केअर सेंटर अकोला येथून 14 जण, ओझोन हॉस्पीटल व हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी दोन तर आयकॉन हॉस्पीटल येथून एक अशा एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान एकाचा मृत्यू झाला. त्यात 60 वर्षीय महिला असून त्या हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 15 जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

366 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2524(2224+300) आहे. त्यातील  जण 104 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2054 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 366 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात बुधवारी  दिवसभरात झालेल्या 505 चाचण्यामध्ये 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात आज चाचण्या झाल्या नाहीत. अकोट येथे 65 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे आज चाचण्या झाल्या नाहीत,  पातूर येथे 57 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तेल्हारा येथे 107 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आलामुर्तिजापूर येथे 175 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला तसेच अकोला मनपामध्ये 54 चाचण्या झाल्या त्यात चार पॉझिटिव्ह आले आहे, अकोला जिल्हयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 36 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहा जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे एकूण 505 चाचण्या होऊन त्यात 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात 6369 चाचण्या झाल्या असून 324 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
......




टिप्पण्या