Corona virus news:आज दिवसभरात 12 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज, एक मयत

आज दिवसभरात 12 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज, एक मयत

अकोला,दि.२६:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 337 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 325 अहवाल निगेटीव्ह तर  12 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2412(2152+260) झाली आहे. आज दिवसभरात 14 रुग्ण बरे झाले. आता 331 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 18166 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 17629, फेरतपासणीचे 166 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  371  नमुने होते. आजपर्यंत एकूण 18024 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  15872 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2412(2152+260) आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 12 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेआज सकाळी प्राप्त अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सहा पुरुष आहेत. त्यातील तीन जण हे सय्यदपुरा पातूर येथीलदिवाली मैदान पातूर येथील दोन जण तर उर्वरित रामनगरचिंचखेड ता. बार्शीटाकळी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.  तसेच आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहेत. त्यात मराठा नगरमोठी उमरीकाला चबुतरा सिटी कोतवाली व बाळापूर अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

14 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जणांनाकोविड केअर सेंटर अकोला येथून चार जणआयकॉन हॉस्पीटल येथून चार जण तर कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मोहता मील, अकोला येथील ४५ वर्षीय पुरुष असून तो दि. २२ जुलै रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

331 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2412 (2152+260) आहे. त्यातील  जण 101 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 1980 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 331 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 89 चाचण्या, एक पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 89 चाचण्यामध्ये एक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
 आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात आज चाचण्या झाल्या नाहीत. अकोट येथे 71 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बाळापूरबार्शीटाकळी, पातूर तेल्हारा व मुर्तिजापूर या भागात आज चाचण्या झाल्या नाहीत. तसेच अकोला जिल्हयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 16 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे एकूण 89 चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात 5328 चाचण्या झाल्या असून 266 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
.........

टिप्पण्या