Corona virus news:अकोल्यात कोरोनामुळे 100 रुग्णांचा मृत्यू

अकोल्यात कोरोनामुळे 100 रुग्णांचा मृत्यू


282 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु


अकोला,दि.18: तीन दिवसासाठी जाहीर केलेलं लॉकडाउन अकोल्यात कोरोनाची साखळी तोडण्यास बाधक ठरते की मारक ठरते हे येत्या काही दिवसात समोर येईलच. मात्र, सध्या प्रशासना सोबतच नागरिकांनी lockdown च्या नियमाची अंमलबजावणी गांभीर्याने करणे आवश्यक आहे. कारण अकोल्यात कोरोनाग्रस्तांची मृत्यू संख्याने आज शंभरी गाठली,ही बाब अकोलेकरांसाठी निश्चितच चिंताजनक आहे.


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2065 (1967+98) आहे. त्यातील 101 जण (एक आत्महत्या व 100 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 1682 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 282 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 229 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 221 अहवाल निगेटीव्ह तर  आठ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2065(1967+98) झाली आहे. आज दिवसभरात 15 रुग्ण बरे झाले,असून आता 282 जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 16327 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 15849, फेरतपासणीचे 161 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 317  नमुने होते. आजपर्यंत एकूण 16282 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 14315 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2065 (1967+98) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


आज आठ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात आठ जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालात चार  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चारही पुरुष आहेत. त्यातील तीन जण बोरगाव मंजू येथील तर अन्य एक जण अकोली जहागिर ता. अकोट येथील रहिवासी आहेत. आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष असून ते सर्व मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

काल रात्री(दि.17) रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये पॉझिटीव्ह आलेल्या अहवालांची संख्या आतापर्यंत 98 झाली आहे.त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.


15 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर  कोविड केअर सेंटर मधून 10, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व हॉटेल रिजेन्सी मधून दोन  अशा एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.


दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे पुरुष असून त्यातील एक 76 वर्षीय तर अन्य 54 वर्षीय आहे. हे दोघे जण अकोट येथील रहिवासी आहेत. ते दि.10 रोजी दाखल झाले होते. त्यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.



रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 580 चाचण्या, 22 पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 580 चाचण्यामध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे अकोला मनपा हद्दीत 25 चाचण्या झाल्या त्यात पाच जण पॉझिटिव्ह आले. अकोला ग्रामीण मध्ये 120 चाचण्या होऊन एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. अकोट येथे 58 चाचण्या होऊन त्यात नऊ जण पॉझिटीव्ह आले. तेल्हारा येथे 78 जणांच्या होवून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे 197 चाचण्या होऊन चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. बार्शीटाकळी येथे 27 चाचण्या झाल्या त्यात आज दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर मुर्तिजापुर येथे 75 जणांच्या चाचण्या होऊन एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 580 चाचण्यांमध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजअखेर जिल्ह्यात 1992 रॅपिड ॲन्टीजन टेस्टव्दारे 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.



टिप्पण्या