Corona update:*कोरोना अलर्ट*:आज 23 पॉझिटिव्ह!रॅपिड टेस्ट मध्ये 32 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:आज 23 पॉझिटिव्ह!
रॅपिड टेस्ट मध्ये 32 पॉझिटिव्ह


*आज गुरुवार दि. २३ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १७६*
*पॉझिटीव्ह- २३*
*निगेटीव्ह- १५३* 

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  पाच महिला व १८ पुरुष आहेत. त्यातील नऊ जण सेंट्रल जेल येथील, तीन जण पळसोबढे  येथील, दोन जण सिंदखेड येथील, बोरगांव मंजू, हैदरपुरा खदान, मुर्तिजापूर, रामनगर, पातूर, सरस्वती नगर, नित्यानंद नगर, जीएमसी व सेवरा अकोला येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

दरम्यान आज दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात ५२ वर्षीय महिला असून ती आमीनपुरा अकोट येथील रहिवासी आहे. त्या दि. २० जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच ५० वर्षीय महिला असून त्या बोरगांव मंजू येथील रहिवासी आहे. त्या दि. ७ जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०९४+२०७=२३०१*
*मयत-१०६(१०५+१), डिस्चार्ज- १७९८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३९७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या