Corona treatment:कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख;आज ४८ पॉझिटिव्ह,उपचार घेताना ४ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख;आज ४८ पॉझिटिव्ह,उपचार घेताना ४ रुग्णांचा मृत्यू
अकोला,दि.४:आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३५४ अहवाल प्राप्त झालेत्यातील ३०६ अहवाल निगेटीव्ह तर ४८ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १६६५  झाली आहे. आज दिवसभरात ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर चार रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आजअखेर ३२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १२०६९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ११६७३, फेरतपासणीचे १५० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २४६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ११९९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १०३२७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १६६५ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ४८ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ४८  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १५ महिला व ३२ पुरुष आहेत. त्यातील १४ जण पातूर येथील, १२ जण बाळापूर येथील  खोलेश्वर येथील चार जण, अकोट येथील चार जण, लहान उमरी,  डाबकी रोड व जीएमसी होस्टेल येथिल प्रत्येकी दोन जण तर बार्शी टाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात एकाच रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा पुरुष रुग्ण सरस्वतीनगर अकोट येथील रहिवासी आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३३ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार तर कोविड केअर सेंटर मधून २९ अशा एकूण ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे  श्रीवास्तव चौक, शिवाजीनगर, हरिहर पेठ व पारस येथील रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे सहा जण आंबेडकर नगर येथील, पाच जण अकोट फैल येथील,  जुने शहर, अशोक नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन जण, हरिहर पेठ येथील दोन जण तर  कौलखेड, दगडीपुल, सिंधी कॅम्प,  बसेरानगर, अकोट, हिंगणा, भिमनगर येथील रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.
चौघांचा मृत्यू
दरम्यान आज चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्यात तिघे पुरुष असून एक महिला आहे. त्यातील एक जण बाळापूर येथील ३६ वर्षीय व्यक्ती आहे. हा व्यक्ती २३ जून रोजी दाखल झाला होता. त्याचा काल (दि.३) रात्री मृत्यू झाला. अन्य एक ७२ वर्षीय व्यक्ती अकोट येथील असून हा व्यक्ती दि.२ रोजी दाखल झाला होता. तर अन्य आणखी एक ७२ वर्षीय व्यक्ती  खैर मोहम्मद प्लॉट येथील असून हा व्यक्ती २९ जून रोजी दाखल झाला होता. या दोघांचा आज पहाटे मृत्यू झाला. दरम्यान सायंकाळी आणखी २४ वर्षीय महिला रुग्ण दगावली. ही रुग्ण महान बार्शीटाकळी येथील रहिवासी आहे.  ती  दि.३० जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज दुपारी उपचार सुरु असतांना मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १६६५ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८८ जण (एक आत्महत्या व ८७ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२५५ आहे. तर सद्यस्थितीत ३२२  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे

टिप्पण्या