Bollywood news:ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

मुंबई: हिंदी चित्रपट सृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे आज (२८ जुुलै)मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. माझगाव इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. 
त्यांचं मूळ नाव झैबुन्निसा होतं. अभिनेता-दिग्दर्शक गुरुदत्त यांनी १९५० साली त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली.


मिस्टर एक्स इन बॉम्बे, मदर इंडिया, कोहिनूर, उजाला, नया दौर, इत्यादी चित्रपटांमधे काम केलं. त्यांच्यावर चित्रित झालेल्या कभी आर- कभी पार, मेरे महबूब कयामत होगी, मधुबन में राधिका नाचे रे, ये है बॉम्बे मेरी जान इत्यादी गाण्यांनी त्यांना अपार लोकप्रियता मिळवून दिली.

 

कुमकुम यांनी भारतीय हिंदी चित्रपटात अजरामर  भूूमिका साकारल्या आहेत. कुम कुम  यांचा  जन्म झैबुनिसा,हुसेनाबाद शेखपुरा  बिहार या  ठिकाणी १९३४ मध्ये झाला.  त्यानी आपल्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे ११५ चित्रपट केलेत. मदर इंडिया (१९५७), सन ऑफ इंडिया (१९६२), कोहिनूर (१९६०), उजालानया दौरश्रीमान फंटूशएक सपेरा एक लुटेरागंगा की लहरेराजा और रंक, आंखें (१९६८),हे त्यातील काही निवडक प्रसिद्ध चित्रपट आहेत. त्या सन १९५४ ते १९७३ या कालावधीत चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. कुमकुम यांनी भोजपुरी चित्रपटांतही काम केले. 'गंगा मय्या तोहे पियारी चढैबो' (१९६३) हा त्यांनी काम केलेला एक चित्रपट होता. 

.........


टिप्पण्या