अकोल्यात ग्रामीण भागात कोरोना पसरवित आहे पाय...

अकोल्यात ग्रामीण भागात कोरोना पसरवित आहे पाय...

अकोला:  शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना विषाणू पाय पसरवित आहे. बुधवारी दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 257 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 217 अहवाल निगेटीव्ह तर  40 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2246 (2071+175) झाली आहे. आज दिवसभरात 19 रुग्ण बरे झाले. आता 344 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 17126 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 16620, फेरतपासणीचे 162 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  344  नमुने होते. आजपर्यंत एकूण 17025 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  14954 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2246(2071+175) आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 40 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात  २४ महिला व १६ पुरुष आहेत. त्यातील १६ जण हे पातूर येथीलतीन जण हिवरखेड येथीलबोरगांव मंजूसातव चौकखदानअकोली जहाँगीरवाडेगावआलेगांव येथील प्रत्येकी दोन,  तर मोठी उमरीलोकमान्य नगरअकोटसिंधी कॅम्पजीएमसी हॉस्टेलखडकीविजय नगरन्यु भीम नगर व रामदास पेठ येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त 64 अहवालांत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून देण्यात आली आहे.

19 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तिन जणांनाकोविड केअर सेंटर अकोला येथून एक जणकोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून सात जणांनाआयकॉन हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना  अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

344 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2246(2071+175) आहे. त्यातील 104 जण (एक आत्महत्या व  103 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  1798 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 344 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ३७५ चाचण्या, ३२ पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ३७५ चाचण्यामध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- 
अकोला ग्रामिण भागात आज चाचण्या झाल्या नाहीत.  अकोट येथे ६९ चाचण्या झाल्या आणि दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  बाळापूर येथे  ६३ जणांच्या चाचण्या होऊन  दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बार्शी टाकळी येथे १४२ जणांच्या चाचण्या झाल्या व ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. पातूर येथे  आज चाचण्या झाल्या नाही.  तेल्हारा येथे ही आज चाचण्या झाल्या नाहीत. मुर्तिजापूर येथे २८ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  अकोला मनपा हद्दीत  ४० चाचण्या झाल्या व १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. असे एकूण ३७५ चाचण्या होऊन त्यात ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात ४१९० चाचण्या झाल्या असून २१० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

कोविड १९ बाबत आढावा ग्रामीण भागातील संसर्ग थोपवा- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

महापालिका भागातील संसर्ग थोपविण्यास बऱ्यापैकी यश येत असल्याचे दृष्टिपथात दिसत आहे. त्याच वेळी ग्रामिण भागात वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. तेव्हा ग्रामिण भागात गटविकास अधिकारी व लहान शहरांचे न.पा. मुख्याधिकारी यांनी संयुक्तपणे कृती आराखडा तयार करुन ग्रामिण भागातील वाढता संसर्ग थोपवावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षणमहिला व बालविकास इतर मागासवर्गसामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गविमुक्त जातीभटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याणकामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले.
येथील  नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत कोविड १९ बाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच सर्व तहसिलदार, न. पा मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी ना. कडू यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्ह्यातील अकोला महापालिका हद्दीत रुग्ण संख्या आटोक्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील ग्रामिण व लहान शहरांच्या भागात  रुग्ण संख़्येत वाढ होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात आला.  यावेळी ना. कडू म्हणाले की, रुग्ण संख़्या थोपविण्यासाठी संपर्क शोधणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज पॉझिटीव्ह आलेला रुग्ण या आधी कुणा कुणाच्या संपर्कात होता, त्या व्यक्तिंचा शोधून त्यांचे अलगीकरण करणे व चाचण्या करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपण त्यांच्या संभाव्य संपर्कातून होणारा फैलाव रोखू शकतो. ग्रामिण भागात होत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावरुन एक नोडल अधिकारी नेमण्यात यावा. या अधिकाऱ्यांने सर्व आढावा दैनंदिन घ्यावा. ‘रॅपिड टेस्ट’द्वारे जे जादा लोकांच्या संपर्कात येतात असे दुकानदार, भाजीपाला विक्रेते, रेशनदुकानदार यांच्या चाचण्या करुन घ्या. तसेच ज्या गावांची लोकसंख्या जादा आहे अशा किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना, रॅपिड टेस्ट करण्याचा आराखडा तयार करुन अंमलबजावणी करा,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.
.........

टिप्पण्या