Abuse with women:अमरावतीच्या मोदी हॉस्पिटलमध्ये घडला अत्यंत घृणास्पद प्रकार; कोरोना चाचणीसाठी गेलेल्या तरुणीसोबत गैरप्रकार Extremely disgusting thing happened at Modi Hospital in Amravati; Abuse with a young woman who went for a corona test

अमरावतीच्या मोदी हॉस्पिटलमध्ये घडला अत्यंत घृणास्पद  प्रकार

                                f i l e p h o t o
*कोरोना चाचणी साठी तरुणी गेली होती हॉस्पिटलमध्ये

*महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही – ॲड. यशोमती ठाकूर


अमरावती जिल्ह्यातून महिला देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचली आहे. महिलांचा गौरव करणारी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव देणारी भूमी असा जिल्ह्याचा लौकिक आहे. मात्र या जिल्ह्यात आज अत्यंत लांच्छनास्पद असा प्रकार घडला आहे. 

अमरावती,दि.३०: वास्तविक कोविड चाचणीसाठी नाक आणि घसा या दोनच ठिकाणचे स्वॅब घेतले जातात. मात्र,अमरावती मधील एका हॉस्पिटलमध्ये एका तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब  घेण्यात आला. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर पीडीत तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रयोगशाळा तंत्रज्ञाविरुध्द बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अल्पेश देशमुख अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.बडनेरा मार्गावरील एका मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानमध्ये काम करणारा एक कर्मचारी २४ जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह आढळला.पीडीत तरुणी देखील येथे काम करत होती. यामुळे त्याच्या संपर्कातील सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.
तिथे काम करणारे २० कर्मचारी मंगळवारी बडनेरातील मनपाच्या मोदी हॉस्पीटलमध्ये रॅपिड अन्टीजेन टेस्टसाठी गेले होते. यामध्ये काही महिला कर्मचारीही होत्या. दरम्यान, एका २४ वर्षीय तरुणीच्या नाकातून स्वॅब घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्वॅब घेण्यासाठी कार्यरत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञाने गुप्तांगाचा स्वॅब घ्यावा लागतो, असे सांगून स्वॅब घेतला. यानंतर मात्र, हा प्रकार गैर असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. 

महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही – ॲड. यशोमती ठाकूर

मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून सदर गुन्हेगारास कठोर शिक्षा मिळावी. सदर व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली आहे. असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.


येथील मोदी रुग्णालयात एका युवतीचा कोरोना चाचणीसाठी थ्रोट स्वॅब घेतल्यानंतर लॅब टेक्निशियनने तिला अनावश्यक चाचणी करण्यास सांगून गैरवर्तणूक केली. त्यानंतर युवतीला आक्षेपार्ह संदेशही पाठवले. या अश्लाघ्य प्रकाराची तक्रार पीडित मुलीने बडनेरा पोलिसात नोंदवली आहे. पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची जरब निर्माण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या यांच्या महाराष्ट्रात असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार सदर टेक्निशियनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अनेकदा असे प्रकार घडले तरी मुली तक्रारी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अशा प्रवृत्ती फोफावतात. त्यामुळे मुलींनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार केली पाहिजे व गुन्हेगारी वृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. पालकांनीही याबाबत मुलींशी सुसंवाद ठेवून त्यांना निर्भय बनविले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करता कामा नये. मुलींनी निर्भयपणे बोलावे, पुढे यावे, व्यक्त व्हावे, घाबरू नये. शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे  ठाकूर यांनी सांगितले.


युवा पिढीत अशी विकृती निर्माण होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. समाजातील अशी विकृती नष्ट करण्यासाठी सुसंस्कार व सातत्यपूर्ण समुपदेशनाची गरज आहे. महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी युवा पिढीला सुसंस्कारित करणे व विधायक कार्याकडे वळविण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

......


From Amravati district, a woman has reached the post of President of the country.  The district is famous for being a land that glorifies women and gives scope to their activism.  However, this type of bribery has taken place in this district today.





टिप्पण्या