Aashadhi ekadashi:कोरोना पासून देशाची मुक्तता होवून, महाशक्तीशाली दिशेने वाटचाल करावी

कोरोना पासून देशाची मुक्तता होवून, महाशक्तीशाली दिशेने वाटचाल करावी

आमदार शर्मा यांचे पंढरीनाथाकडे साकडे


अकोला: covid-19 या महामारी पासून मुक्तता होवून शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, नोकरीपेशा व सर्वसामान्य नागरिक, चाकरमानी सुखी संपन्न व्हावे व आर्थिक मंदी पासून सुटका व्हावी तसेच चीन पाकिस्तान नेपाल यांच्या षडयंत्रवर मात करण्याची शक्ती भारत सरकार , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या सीमेवरील शूर सैनिकांना प्रदान करो, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश महाशक्तिशाली दिशेने वाटचाल करावी, असे साकडे घालून अकोल्यातील covid-19 व मृत्यू दर कमी व्हावे, अशी आराधना प्रार्थना अकोला शहरातील पुरातन प्राचीन जागृत  जुने शहरातील विठ्ठल रुख्मिणी यांच्या चरणी मंदिराचे सर्वसेवाधिकारी व अकोला पश्चिमचे  आमदार  गोवर्धन शर्मा यांनी केली. 

तीन पिढी पासून शर्मा परिवार जुन्या शहरातील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटे चार वाजता वेद पाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने महाभिषेक विशेष पूजा अर्चना सर्वसेवाधिकारी या नात्याने करतात .

या वर्षी पूजेचा मान मनपा स्थायी समिती  सभापती  सतीश ढगे व चारुशीला ढगे याना देण्यात आला. ढगे यांचे हस्ते श्री विठ्ठल रुख्मिणीस अभिषेक करण्यात आला.
तसेच गंगादेवी गोवर्धन शर्मा,  कृष्णा शर्मा,  अर्चना शर्मा,  प्राध्यापक अनुप शर्मा,  आरती शर्मा , किशोर पाटील यांनी पूजा-अर्चना केली. यावेळी  पंडित  आशिष बलाखे, पंडित दत्तात्रय जोशी, पंडित गोविंदराव परचुरे , पंडित रुपेश कुलकर्णी यांनी मंत्रोपचाराने अभिषेक व महापूजा विधी केला .


तसेच या दरवर्षी उत्साह मध्ये साजरा होणारा अखंड हरीनाम सप्ताह यावर्षी परंपरेनुसार पण प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने फक्त वीणा (प्रहरकरी) घेऊन संपन्न करत आहे . यावर्षी अखंड हरीनाम सप्ताहाचे ८९ वे वर्ष आहे. 


हा सप्ताह व आषाढी एकादशी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्वसेवाधिकारी श्री गोवर्धन शर्मा यांचे मार्गदर्शनात व व्यवस्थापक  रमेश अलकरी यांचे नेतृत्वात मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आनंद उगले , यशोधन गोडबोले , नितीन खोत , शरद उमाळे , विकास वाणी , संजय ठाकूर , बबलू गुर्जर , संग्राम खानझोडे , महेश कडुस्कर , श्याम घाटे , मुदिराज  दिनेश बंकुवाले , संजय बंकुवाले , चंद्रकांत चाळसे , विवेक  भौरदकर,  जितेंद्र खिलोसिया ,  मधुकर ठाकरे , श्याम उमाळे ,  राजुशेठ गुर्जर , उदय गंगाखेडकर , विजय बंकुवाले, अशोक संचेला , संदीप देशमुख , प्रशांत गावंडे , पीयुष वाघ , आशिष शर्मा , अनुप खोत, विनोद बर्डे, अभय निंबाळकर , हर्ष सांचला , राम सोगले , अभिषेक मानकर ,, परिमल भड , यश ठाकूर ,  हर्ष शर्मा , लकी शर्मा  , ओम भडके , अक्षय दाभाडे , आशुतोष सरनाईक , ऋषिकेश सरनाईक , कल्पेश ठाकूर , तिलक श्रीवास , पार्थ कडुस्कर ,  सार्थक चाळसे यांचे सह अनेक कार्यकर्ते झटत आहेत.


सोमठाणा येथे श्रीविठ्ठल प्रेम भक्तीचा कल्लौळ !

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर (सोमठाणा) आयोजित गेल्या ११९ वर्षाची आषाढी वारीची परंपरा खंडित 

कोविड १९ च्या वैश्विक संकटामुळे यावर्षी आषाढ वारी महोत्सवाला शासनाने स्थगिती दिली.  त्यामुळे वारकऱ्यांची स्थिती "कासाविस माझा जिव तुझ्या भेटीसाठी "अशी स्थिती झाली आहे. मात्र, आमच्या संताच्या मांदियाळींनी संस्काराच्या शिकवणीच्या मुशीतुन तयार झालेल्या वारकरी संप्रदायाची अध्यात्मिक प्रगल्भता अघात आहे. त्याची दृष्टी अगोचर झाली आहे. श्री विठ्ठलाचा अंश प्रत्येक जिवात बघतो, त्याच्या प्रेम भक्तिची प्रतिमा त्याच्या अंतरमनांत सदैव रुजली आहे. वारकरी यात्रेला जातो, तो पंढरित चहूवाटांनी आलेल्या भक्तांच्या भेटी साठी. संतसंग सर्वकाळ. अखंड प्रेमाचा कल्लौळात आत्मविभोर होण्या करिता. त्या स्वानुभवाची अनुभूती म्हणुन,श्री विठ्ठल रुक्मिनी संस्थान , श्री गोंडुजी महाराज प्रणित दिंडी सोमठाणा येथील वारकरऱ्यांनी १जुलै रोजी श्रीक्षेत्र सोमठाणा ग्रामी ,स्थानिक वारकऱ्यांच्या उपस्थितीत शासन नियमांच्या अधीन राहुन दिंडीचे आयोजन केले होते.

...........

टिप्पण्या