*कोरोना अलर्ट* आज 38 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट* आज 38 पॉझिटिव्ह!

*आज रविवार दि.५ जुलै २०२० सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
 
*प्राप्त अहवाल-११९*
*पॉझिटीव्ह-३८*
*निगेटीव्ह-८१*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळच्या अहवालात ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात ११ महिला  व २७ पुरुष आहेत. त्यातील आठ जण पक्की खोली येथील,सात जण आदर्श कॉलनी, सात जण अकोट,पाच जण चांदुर,दोन जण बार्शी टाकळी, दोन जण कच्ची खोली तर उर्वरित राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव,पातुर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ८२ वर्षीय पुरुष असून तो दि.२ रोजी दाखल झाला होता.काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मयत व्यक्ती सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे.

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१७०३*
*मयत-८९(८८+१), डिस्चार्ज १२५५*
*दाखल रुग्ण(ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५९*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
 
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या