वाशिम मध्ये मान्सूनची हजेरी;
पहिल्या पावसातच कामरगावचे शेतकरी आले अडचणीत
सुनील गावंडे यांच्या शेताच्या अर्धा भागात साचले पाणी
वाशिम : मान्सूनने वाशिम जिल्ह्यातही हजेरी लावली आहे. मात्र, या पहिल्याच पावसात कामरगाव येथील काही शेतकरी अडचणीत आले आहे. ते म्हणजे,
अमरावती-कामरगाव-कारंजा या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे.
रस्त्याच्या कामाकरिता शासनाने निधी सुद्धा दिला. तरी मात्र, दोन वर्षापासून हे काम अपूर्ण असल्याने याचा फटका येथील सहा अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत आहे. रस्त्यावरील साचलेले पाणी जाण्याकरिता रस्त्यालगत नाली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सुरुवातीच्या पावसातच तलावा सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दीड एकर शेती असलेल्या सुनील गावंडे या शेतकऱ्यांसाठी हे मोठे संकट आहे. गावंडे यांच्या शेताच्या अर्धा भागामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतात पेरणी करणेही शक्य नाही. अशा अनेक शेतकऱ्यांना रस्त्याच्या बाजूला नाली नसल्याने विना कारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देवून या शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
..........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा