Struck by lighting: वीज पडून दोन बैल दगावली पिंपळगाव हांडे येथील घटना

वीज पडून दोन बैल दगावली
पिंपळगाव हांडे येथील घटना
अकोला: जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव हांडे येथील शेतकरी दशरथ रामराव हांडे यांना शनिवारी शेतात पेरणी सुरू असतांना बैलजोडी गमवावी लागली.
हांडे हे त्यांच्या शेतात दुपारी चार वाजताच्या सुमारास पेरणी करीत होते. याच दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पेरणी सुरु असतांना अचानक विज पडली.या विजेच्या धक्क्याने बैलजोडी सहा फूट दूर फेकल्या गेली. या घटनेत दोन्ही बैलांचा जागेवरच मृत्यू झाला.मात्र, सुदैवाने या घटनेत शेतकरी तसेच शेतात काम करणारे मजुर वाचले. तर दोन गाई सुध्दा विजेच्या तडाख्यात सापडल्या आहेत,अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.तालुक्यातील इतर गावात झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
.........

टिप्पण्या