- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जाणता राजा...छत्रपती शिवाजी महाराज!
शिवराज्यभिषेक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा !
जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं अशा महामाता राजमाता जिजाऊ यांनी बाळकडू पाजलेले, ज्यांनी महाराष्ट्राला स्वत:ची अस्मीता व अस्तीत्वाचा शोध दिला असे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या कुशीत घडले. त्यांनी फक्त किल्लेच जिंकले नाही तर इथला शेतकरी जगवला, तेंव्हाचा शेतकरी फार सुखी होता, तेंव्हा कोणताही शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा होता. त्यांची प्रतिमा हिंदूचे रक्षणकर्ते म्हणून जास्त रंगवण्यात आला परंतू शिवाजी महाराजांचे दरबारी अठरा पगड जातीचे शूर मावळे होते व महत्वाचे दरबारात दलरक्षक, खजीनदार, ते त्यांचे वकीलापर्यंत विश्वासू म्हणून मुस्लीम होते, परंतू शिवाजी महाराजांचे मुस्लीम द्वेष दाखवून तथाकथित इतिहासकारांनी समाजात दुही माजवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले.
सुरतेवर स्वारी....
शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटले. बादशहाने गोरगरीबांना त्रास देऊन एकत्र केलेले धन स्वराज्याच्या उपयोगासाठी महाराजांनी लुटून आणले. महाराज सुरतेत दाखल झाले. शहरात हाहाकार माजला, इनायत खान हा सुरतेचा सुभेदार होता. शहराच्या रक्षणासाठी बादशहाकडून खुप मोठी रक्कम घेऊन प्रत्यक्षात त्याने सैनिक कमी ठेवले होते. तो सुरतेच्या किल्ल्यात जाऊन लपला होता. शहरातील श्रीमंतांकडून पैसे घेऊन त्याने किल्ल्यामध्ये आश्रय दिला होता. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांनी गुप्त माहीती आणल्याप्रमाणे धनाची ठिकाणे लुटली जाऊ लागली. लपवून ठेवण्यात आलेले सर्व धन मराठ्यांनी शोधून काढले.
शहरात एक डच व्यापार्यांची विधवा पत्नी आपल्या तीन चिमुरड्यासं राहत होती. मराठ्यांनी आक्रमण केल्याची बातमी तिच्या कानावर पडली. ती फार घाबरली.तिने घराचा दरवाजा बंद.केला, थरथर कापू लागली! खिडकीतून पाहू लागली. तेंव्हा तिला तीन/चार सैनिक येतांना दिसले. तिच्या हृदयात चर्रर्र झाले. आता आपली काही खैर नाही असे तिला वाटले. सैनिक घोड्यावरून खाली उतरले. त्या महिला चिमुरड्यांना कवेत घेऊन रडू लागली, आक्रोश करू लागली. तरी सैनिक तिला दारातच उभे दिसू लागली. तिने चिडून दरवाजा उघडला व द्वेषाणे म्हणाली, ‘‘लुटा, लुटा, मारा आम्हाला, तुम्हाला हवं ते करा’’ त्यावर एक सैनिक बोलला, ‘‘नाही ताई, आम्ही तुला लुटायला किंवा मारहाण करायला आलो नाही. चुकून आमच्या मराठी सैनिकांकडून तुला त्रास होऊ नये म्हणून आम्हाला तुझ्या रक्षणासाठी आमच्या शिवाजी राजांनी पाठविले आहे. तुला कसलाही त्रास होणार नाही.’’ मराठी सैनिक सुरतेत असेपर्यंत त्यांनी तिचे रक्षण केले. सुरतेच्या लुटीतही न्यायनितीमत्तेचा सन्मान मराठ्यांनी केला, असे शिवराय आया बहीणीच्या इज्जतीचे रक्षण करणारा महान असा राजा होता.
शाहीस्तेखानाची बोटे काटली तेंव्हा सर्वीकडे हाहाकार माजला, शाहीस्तेखानाची बहीण त्याच्याजवळ आली व म्हणाली ‘‘भाईजान, मेरी बेटी गायब हो गयी है । उसे शिवाजी महाराज के लोग उठा के ले गये है ।’’ त्यावर शाहीस्तेखान म्हणाला,‘‘नहीं, शिवाजी महाराज के लोग ऐसा गलत काम करते नहीं, अगर लेकर भी गये तो शिवाजी महाराज अपनी बेटी के जैसा मानेंगे’’ यह मेरा विश्वास है । दुष्मनालाही भरोसा असणारे आमचे शिवाजी महाराज होते. परंतू शिवाजी महाराजांच्या नावाने आलेले सरकारने नगर जिल्ह्यात एका महिलेला मुलाला अॅडमिशन देण्यासाठी शरीर सुखाची मागणी करत होते, तेथील पोलीस, संस्थाचालकांविरुद्ध तक्रारी झालेल्या असतांना सरकारचे गृहखाते त्यांना पाठीशी घालतांता आम्ही पाहले.
मुल्ला नसरुद्दीन - इतिहासकार होता : शिवाजी महाराजांना प्रखर विरोध करायचा तो आपल्या चरीत्रामध्ये लिहीतो की, शिवाजी महाराज जर मक्का-मदिना मध्ये जरी गेले तरी इसको मैं मारुंगा, एवढा विरोध करणारा पुढे लिहीतो की, ‘‘महिला की अबु्र बचानेवाला दुनियाका एकमेव राजा शिवाजी है ।।’’
औरंगजेब - ९५ वर्ष जगला, शिवाजी महाराज ५० वर्षे जगले, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेंव्हा औरंगजेब मसजीदमध्ये गेला व म्हणतो की, ‘‘या अल्ला परवार दिगार, बहु बेटीयों का रक्षण करनेवाला, गुजर गया है ।।’’
संविधानाची निर्मिती करतांना मला अडचण आली नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची पायवाट होती’’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत़ या देशातील पहिला ‘जाणता राजा’ ही पदवी राजांना शोभून दिसते.
जगाच्या इतिहासात आपले प्रशासन व न्याय व्यवस्था पारदर्शक ठेवणारा छत्रपती सारखा दुसरा राजा सापडणे नाही, रांझे गाव - वतनदार पाटील, गरीब शेतकर्याच्या मुलीला दिवसा ढवळ्या उचलून घेऊन गेला. उपभोग घेतला. हे महाराजांना कळले त्याला गुन्हेगार ठरविले. त्याला पुण्याला आणून त्याचे हात-पाय छाटले. हीच त्याला शिक्षा !!
शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला : पुर्वी राजाचा मुलगाच राजा होत असे. शिवाजी महाराज हे ब्राम्हाणाचे ठायी शुद्र होते म्हणून ते महाराजांचे राज्यभिषेकाला प्रचंड विरोध होता. परंतू गनीमी काव्याचे ते छत्रपती होते, शिवाजी महाराजांनी काशीच्या गागा भट्टला बोलावून राज्यभिषेक करवून घेतला. प्रश्न हा आहे की खुद महाराजांनाही राज्यभिषेक करण्यासाठी सनातन्यांनी विरोध केला होता, त्यांच्या अपमानाचा बदला घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अशी तरतूद केली की, जातीने तो कोणीही का असेना, फकीरालाही जर त्यांच्यात लायकी असेल आणि त्यांना जनतेने निवडून दिले तर त्याला प्रधानमंत्री होता येते, म्हणून चहा विकणारे गरीब आहो म्हणतात असे सांगणारे मोदीजी देशांचे पंतप्रधान होतात, या देशावर तसेच मोदी साहेबावर बाबासाहेबांचे अनंत असे उपकार आहेत.
शिवरायांचे शौर्य, सर्वसमावेशकता, न्यायबुद्धी, सामाजिक,राजकीय आत्मभान असणारे छत्रपती, शिवराज्यभिषेक दिनाच्या समस्त भारतीयांना शुभेच्छा !
लेखक
- पंजाबराव ब. वर,
मो.नं. ९९२२९२४६८४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा