Modi Government:मोदी सरकारची दुसऱ्या पर्वातील पहिल्या वर्षात प्रभावी कामगिरी; कोरोनाचा मुकाबला,आत्मनिर्भर भारत, ऐतिहासिक निर्णय - ना. संजय धोत्रे Modi government's impressive performance in the first year of the second phase; Corona combat, self-reliant India, historic decision - Sanjay Dhotre

मोदी सरकारची दुसऱ्या पर्वातील पहिल्या वर्षात प्रभावी कामगिरी; कोरोनाचा मुकाबला,आत्मनिर्भर भारत, ऐतिहासिक निर्णय - ना. संजय धोत्रे

*देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले

*पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान मधील पीडीत धार्मिक अल्पंसख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले.


भारतीय अलंकार
अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला  येथे केले.

मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, आ. गोवर्धन शर्मा, आ प्रकाश भारसाकळे, आ हरीश पिंपळे, तेजराव थोरात, महापौर अर्चना मसने, गिरीश जोशी, जयंत मसने उपस्थित होते.

यावेळी ना. संजय धोत्रे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे. भारताची लोकसंख्या आणि कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४  देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र एकसारखीच लोकसंख्या असूनही १ जून २०२० ला या १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे. या १४ देशांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे. वेळीच लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यामुळे हे शक्य झाले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने देशभरात लॉकडाऊनचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य झाले असे ही या वेळी ना. धोत्रे म्हणाले.

ते म्हणाले की, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली.आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने  केले असल्याचे या प्रसंगी ना धोत्रे यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघू उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल.

ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू करणे तसेच पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान मधील पीडीत धार्मिक अल्पंसख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले. गेली अनेक दशके ज्यांची देशवासियांना आस होती, असे निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली आहे.

अकोला लोकसभा मतदार संघात रस्ते विकासच्या अंतर्गत जुना राष्ट्रीय महामार्ग शिवर-पी.के.व्ही- वाशीम बायपास, अकोला ते महान, अमरावती-अकोला-चिखली, वणी राम्भापूर – कानशिवणी, अकोट शहरातील रस्ते सौंदर्यीकरणाची कामे, अकोला – अकोट – अंजनगाव, शेगाव- देवरी, मंगरूळपीर – महान, मालेगाव – रिसोड, रिसोड – हिंगोली अशी कामे प्रगतीपथावर आहेत. अकोला – अकोट रेल्वे मीटरगेजच्या गेज परिवर्तनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच अकोला – पूर्णा रेल्वे विद्युतीकरण कामाला सुरुवात झाली आहे. तिसरा अकोला रेल्वे स्थानकावर ओव्हर ब्रिज, अशोक वाटिका ते रेल्वे स्थानक उड्डाण पूल, डाबकी रोड, न्यू तापडिया नगर उड्डाण पूल, अकोट रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. कृषी विद्यापीठ येथे सुपर संगणक बसविण्यात आले आहे त्यामुळे शेतीविषयक संशोधन, हवामानाची माहिती, कीड रोग व्यवस्थापन, अन्न द्रवाची अचूकता याची अद्यावत माहिती मिळण्याची सोय झाली आहे.

गरजू व गरीब रुग्णांना आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार कडून १५० कोटी रुपयेनिधी खर्च करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय संपूर्ण वैद्यकीय उपकरणासह सज्ज आहे तसेच जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय येथे ब्रेस्ट कॅन्सर शिबीर घेऊन अद्यावत तंत्रज्ञानाने तपासणी करण्यात आली. अकोला येथे पासपोर्ट कार्यालयात आतापर्यंत ११४२२ नागरिकांना याचा फायदा घेतला आहे. दूरसंचार सेवा अंतर्गत १ लाख १८ हजार ३७८ ग्राहकांना लाभ होत आहे. अकोला महानगर पालिका क्षेत्रामध्ये भूमिगत गटार योजना, अमृत योजना व शहराचे विस्तारीकरण पाहता २५ वर्षाची लोकसंख्या लक्षात घेता नवीन ८ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या  निर्माण  करण्या आल्या, अकोला शहरामध्ये विजेची बचत होऊन २५ हजार एलएडी पथदिवे  लावण्यात आले, अकोला शहर घन कचरा प्रक्रिया करण्यासाठी भोंड येथे प्रक्रिया केंद्र सुरु करण्याची तयारी सुरु आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्स व इतर देशातून विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आले, नवोदय विद्यालयातील विद्यार्थी, परप्रांतीय कामगारांसाची श्रमिक रेल्वे  उपलब्ध करून देण्यात आल्या. कोविड-१९ च्या काळामध्ये १ लाख ४८ हजार नमो थाळी, राम प्रसाद च्या माध्यमातून भोजन पाकिटाचे वितरण करण्यात आले, २९०३० राशन पाकिटे, पीएम केयर फंडामध्ये २५ लाख ८२ हजार रुपये पक्ष कार्यकर्त्यांनी जमा केले आहे. कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या आशीर्वादाने आपण सदैव कार्यरत राहू अशी माहिती संजय धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
..........................................
Modi government's impressive performance in the first year of the second phase;  Corona combat, self-reliant India, historic decision -  Sanjay Dhotre
...........






 
  

टिप्पण्या