- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गर्जा महाराष्ट्र माझा
साप्ताहिक समालोचन
२१ ते २७ जून या कालावधीतील शासकीय निर्णय आणि घडामोडी
कोरोना युध्द
21 जून 2020
- कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान, सध्या ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू. १५९१ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ६५ हजार ७४४, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के), ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाइन, २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन. १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद.
- 15 मे 2020 ते 21 जून 2020 या काळात 20 लाख 50 हजार 23 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा, मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्यांपैकी 8,222 अनुज्ञप्ती सुरू. 24 मार्च 2020 पासून शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/ कर्मचारी तैनात. 20 जून 2020 पर्यंत 8,756 गुन्ह्यांची नोंद, 4,127 आरोपींना अटक, 756 वाहने जप्त, 22 कोटी 22 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
- महाराष्ट्र सायबर विभागामार्फत ४९४ गुन्हे दाखल, २६१ व्यक्तींना अटक.
- ऑनलाइन बँकिंग व्यवहार करत असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये व सावधानता बाळगावी असे महाराष्ट्र सायबर विभागामार्फत आवाहन.
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ९९ हजार २८० पासेसचे पोलीस विभागामार्फत वितरण. २२ मार्च ते २० जून या कालावधीत १,३३,३११ गुन्ह्यांची नोंद, २७,२६६ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ३२ लाख २३ हजार ७११ रुपयांचा दंड, पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७५ घटना, ८५४ व्यक्तींना ताब्यात, हेल्पलाइन १०० वर १,०३,९९६ दूरध्वनी, क्वारंटाइन असा शिक्का असलेल्या ७३४ व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल, ८३,४९७ वाहने जप्त.
22 जून 2020
- हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत शासनाने दि.15 जून, 2020 रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आल्याचे उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याद्वारे स्पष्ट.
- कोरोना संकटामुळे लागू टाळेबंदीमुळे शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने खासदार श्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचे वितरण करणे, अंशत: अनुदानित शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा देण्याचा शासननिर्णय जारी करणे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणे, अघोषितला घोषित करुन अनुदान देणे आदी मुद्यांबाबत शासन सकारात्मक असून या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करुन निर्णय घेण्यात येईल, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
- ३७२१ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू. १९६२ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी परतलेले रुग्ण - ६७ हजार ७०६, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह (१७.२४ टक्के), ६ लाख १ हजार १८२ लोक होम क्वारंटाइन, २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाइन. आज ६२ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद.
- सायबर संदर्भात ४९६ गुन्हे दाखल, २६१ व्यक्तींना अटक. आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९५ गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २०४ गुन्हे, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २६ गुन्हे, आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ९ गुन्हे दाखल, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल. अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ५८ गुन्हे, १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश.
- कोरोना चाचण्यांसाठी राज्यात प्रयोग शाळांची संख्या 103, त्यात 60 शासकीय 43 खासगी प्रयोगशाळा. 26 मे 20 जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत 30 ने वाढ, प्रति दशलक्ष चाचण्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे राज्याचे प्रमाण 5847 , देशपातळीवरील प्रमाण 4610. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात. प्रयोगशाळांचा तपशील- मुंबई- 27 (शासकीय 12, खासगी 15), ठाणे- 7(शासकीय 2, खासगी 5), नवी मुंबई- 3(शासकीय 1, खासगी 2), पुणे- 22, ( शासकीय 10, खासगी 12), नागपूर - 11 (शासकीय 7, खासगी 4), कोल्हापूर- 3 (शासकीय 2, खासगी 1), नाशिक- 4 (शासकीय 2, खासगी 2), सातारा- 2 (शासकीय 1, खासगी 1), अहमदनगर -2 (शासकीय 1, खासगी 1), पालघर (डहाणू) -1, रत्नागिरी -1, सिंधुदूर्ग -1, सांगली (मिरज)- 1, सोलापूर- 2, धुळे- 1 जळगाव -1, अकोला- 1, अमरावती- 2, यवतमाळ- 1, गडचिरोली- 1, चंद्रपूर-1, गोंदिया - 1, वर्धा- 1, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, बीड- 1, लातूर- 1, परभणी- 1
- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे ऑनलाईन वर्ग भरवण्याच्या प्रात्यक्षिकाची पाहणी व विद्यार्थ्यांशी संवाद. ठळक मुद्दे- येत्या काही दिवसात शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासाठी सादरीकरण करून त्यांच्याकडून सूचना मागवा. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शैक्षणिक अभ्यासक्रम असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी वाढवा, तो सहजरीत्या ऑफलाइन उपलब्ध करुन द्या. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा निर्माण करा. इतर मुद्दे- जिओ टीव्हीवर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या, या टीव्ही वर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे नियोजन, दूरदर्शनकडे दिवसाला ४ ते ५ शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन,
- वंदेभारत अभियानांतर्गत विविध देशातून आतापर्यंत १०५ विमानांनी १६ हजार २३४ प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईचे ६००९, उर्वरित महाराष्ट्रातील ५३८९ आणि इतर राज्यातील ४८३६ प्रवासी.
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६१० पासेसचे पोलीस विभागामार्फत वितरण, २२ मार्च ते २१ जून या कालावधीत १,३३,७३० गुन्ह्यांची नोंद, २७,४४६ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ४१ लाख ३२ हजार ४६१ रुपयांचा दंड.
- कोविड - १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांची माहिती.
२३ जून २०२०
- कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू, १९२५ रुग्णांची आज घरी रवानगी. आतापर्यंत घरी रवानगी केलेल्या रुग्णांची संख्या - ६९ हजार ६३१. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०९ टक्के. आज २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिलाचे वितरण. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना जून महिन्याची वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध करुन देण्यात आल्याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा. वाढीव वीजबिलांची पडताळणी करण्यासाठी लिंक- https://billcal.mahadiscom.
in/consumerbill/ - सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेलचा वापर करत असल्याने त्यापासून सावधानता बाळगण्याचे महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन. चीनच्या हॅकर्सव्दारे 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचे नियोजन. ncov2019@gov.in या ईमेलचा त्यासाठी वापर. या सायबर हल्लयामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती.
- शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा इषारा.
- सायबर संदर्भात ४९८ गुन्हे दाखल, २६१ व्यक्तींना अटक.
- आज ४१६१ रुग्णांची घरी रवानगी. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ७३ हजार ७९२. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के. ३८९० नवीन रुग्णांचे निदान, सध्या ६२ हजार ३५४ रुग्णांवर उपचार सुरू, आज २०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. महिन्याभरात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांची विक्रमी संख्या, एकाच दिवशी ४१६१ रुग्णांची घरी रवानगी.
24 जून 2020
- 52 हजार 440 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे सुरळीत वितरण सुरु, 1 जून ते 23 जून पर्यंत 1 कोटी 24 लाख 66 हजार 122 शिधापत्रिका धारकांना 47 लाख 93 हजार 690 क्विंटल अन्नधान्याचे वाटप. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब (सुमारे ७ कोटी) लाभार्थ्यांना 17 लाख 4 हजार 213 क्विंटल गहू, 13 लाख 3 हजार 834 क्विंटल तांदूळ, 87 हजार 6 क्विंटल साखरेचे वाटप. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (एप्रिल ते जून पर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहिन्याला ५ किलो मोफत तांदूळ) - दि. 1 जून पासून एकूण 62 लाख 89 हजार 464 रेशनकार्डवरील 2 कोटी 82 लाख 69 हजार 362 नागरिकांना 14 लाख 13 हजार 470 क्विंटल तांदुळाचे वाटप. कोविड-१९ संकटावरील उपाययोजना (३ कोटी ८ लाख ४४ हजार ७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रत्येक व्यक्तिस ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो). जून 2020 मध्ये आतापर्यंत 3 लाख 25 हजार 60 क्विंटल वाटप. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ)- 2 लाख 3 हजार 179 क्विंटल डाळीचे वाटप. आत्मनिर्भर भारत योजना अन्नधान्य (मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी-राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रत्येक व्यक्तीस 5 किलो मोफत तांदूळ) - 47 हजार 110 क्विंटल तांदूळ वितरित.
- 1 जून ते 23 जून पर्यंत 851 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 23 लाख 60 हजार 684 शिवभोजन थाळ्यांचे वाटप. एप्रिल ते जून या कालावधीत 81 लाख 44 हजार 461 शिवभोजन थाळ्या वाटप.
- वंदे भारत अभियानांतर्गत १२५ विमानांनी १९ हजार ६०४ प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ७२१८, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ६६८१, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ५७०५.
- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून २२ मार्च ते २३ जून या कालावधीत १,३४,६०१ गुन्ह्यांची नोंद, २७,५११ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ७१ लाख ६४ हजार ८४४ रुपयांचा दंड, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल, ८४,२३६ वाहने जप्त.
- उद्योग विभागामार्फत दोन सामंजस्य करार- (१) डीबीजी इस्टेट कंपनी - ९०० कोटी रुपयांचे गुंतवणूक करार, २७०० नोकऱ्या उपलब्ध. भिवंडी येथे अमेझॉन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांसाठी लॉजीस्टिक पार्कची उभारणी. (२) जपानच्या आयडीयल केमी प्लास्ट कंपनीसोबत ११७ कोटींचा गुंतवणूक करार, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे उद्योगाची उभारणी. ८८ जणांना रोजगार उपलब्ध.
- केंद्र शासनानामार्फत किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस १५ जुलै पर्यंत मुदतवाढ, नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी दिली असल्याची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
- भायखळा पूर्व भागात महापालिकेने उभारलेल्या १ हजार 'बेड' क्षमतेच्या 'जम्बो फॅसिलिटी' कोविड उपचार केंद्राची क्रीडामंत्री श्री सुनील केदार यांच्यामार्फत पहाणी. सुविधा - १ हजार खाटा, यापैकी ३०० खाटा 'ऑक्सिजन बेड', ५० डॉक्टर्स, १०० नर्सेस आणि १५० परिचर.
- कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधीसह परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदलाची स्थापना. सदस्य - अपर मुख्य सचिव (परिवहन), सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) मुंबई, उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाव्यवस्थापक मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाचे प्रतिनिधी, विविध ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनाचे प्रतिनिधी, अध्यक्ष महाराष्ट्र ट्रक, टेम्पो, ओनर्स असोसिएशन मुंबई, वेब बेस्ड टॅक्सी (ओला, उबेरासह) चालक संघटनांचे प्रतिनिधी, बस अँन्ड कार ऑपरेटरर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी, मुंबई बस मालक संघटनांचे प्रतिनिधी.
- सायबर संदर्भात ४९९ गुन्हे दाखल, २६१ व्यक्तींना अटक.
25 जून २०२०
- महाराष्ट्र सायबर विभागामार्फत ५०० गुन्हे दाखल, २६२ व्यक्तींना अटक.
- आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल, ५ लाख ९१ हजार व्यक्ती क्वाररंटाइन, २७,५६९ व्यक्तींना अटक विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ८७ लाख ५५ हजार ५६१ रुपयांचा दंड.
- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्यामुळे ठप्प झालेल्या चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरू, काही अटी-शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता, या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री अमित देशमुख यांचे प्रतिपादन. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओ टी टी यांच्या चित्रीकरणासंदर्भात, ३० मे २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत स्पष्टीकरण http://www.maharashtra.gov.in&
nbsp ; या संकेतस्थळावर उपलब्ध, सांकेतांक २०२००६२४११०९३७८२३ - वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक पंचेचाळीस दिवस आधी जाहीर होणार, विद्यार्थ्यांचे हित आणि भवितव्य लक्षात घेऊन सुरक्षेला प्राधान्य. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानुसार परीक्षांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी.
- मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री.अस्लम शेख यांची माहिती.
- ३६६१ रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी परतलेल्या व्यक्ती ७७ हजार ४५३, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के, ४८४१ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ६३ हजार ३४२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू, आज १९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- औद्योगिक वापरातील वीजशुल्क ९.३ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता. याचा फायदा औद्योगिक घटकांना होऊन उद्योगधंद्यांना स्वस्तात वीज उपलब्ध.
मंत्रिमंडळ निर्णय
- कोविड परिस्थितीनंतर राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी विविध उपाययोजनांना मंजुरी.
- किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत 2019-20 मधील खरीप पणन हंगाम व 2020-21 मधील रब्बी पणन हंगाम अंतर्गत वाहतूक करण्यात येणाऱ्या धान / सीएमआर (तांदूळ) साठी वाहतूक खर्च उपलब्ध करुन देण्यास मान्यता.
- शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे वेळेत देण्यासाठी कापूस पणन महासंघाच्या अतिरिक्त 1000 कोटीच्या कर्जास शासन हमी देण्याचा निर्णय. 1000 कोटी शासनहमीवर कापूस पणन महासंघास शासनास अदा करावे लागणारे हमीशुल्क माफ करण्यास मान्यता.
- राज्यातील उद्योगधंद्याना वीज शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय. सध्याचे विद्युत शुल्क 9.3 टक्के असून ते 7.5 टक्के इतके करण्यात येईल.
- शासनामार्फत मिशन बिगिन अगेन टप्पा चारची घोषणा, त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलुन्स आणि ब्युटी पार्लस दि. २८ जून २०२० पासून सुरु, मात्र या दुकांनामध्ये मर्यादित प्रवेश, पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घेणे आवश्यक.
२६ जून २०२०
- अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला असल्याने त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्था व विद्यापीठांना सूचित करण्याची, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. पत्रातील ठळक मुद्दे - कोविड १९ च्या सर्वाधिक केसेसची नोंद महाराष्ट्रात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, (मुंबई महानगरपालिका क्षेत्र), पुणे महापालिका क्षेत्र, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर सारख्या मोठ्या शहरामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ, विद्यार्थी आणि पालकांना २०१९-२० या वर्षाच्या अंतिम परीक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंता, सध्याचे वातावरण कोणत्याही परीक्षा आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नसल्याने विद्यार्थी, पालक, स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, परीक्षा घेणारी संस्था, वाहतूक आणि प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढवणारे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा राज्याचा निर्णय, अशाच पध्दतीने राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना निर्देश देऊन मान्यता देण्याचे निर्देश द्या, तशा एकसमान सूचना विद्यापीठांसाठी निर्गमित करा.
- कोरोनामुळे खासगी रुग्णालये बंद असल्याने सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप तयार. ॲण्ड्राईड आधारीत ॲप तयार झाल्याने त्याचा स्मार्टफोन धारकांना फायदा. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करुन आतापर्यंत १६०० रुग्णांना या सेवेचा लाभ.
- आतापर्यंत कोविड संदर्भात १ लाख ३६ हजार गुन्हे दाखल, २७,७१७ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ०९ लाख ५४ हजार ०७८ रुपयांचा दंड, ५ लाख ९० हजार व्यक्ती क्वारंटाइन, अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख १५ हजार ७१० पासेस पोलीस विभागामार्फत वितरण.
- महाराष्ट्र सायबर विभागामार्फत ५०१ गुन्हे दाखल, २६२ व्यक्तींना अटक.
- कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत सीएसआर देणगी समन्वयाद्वारे विविध कॉर्पोरेट्स आणि खाजगी देणगीदारांकडून सुमारे ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी केल्याची कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती. ३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किट्सचे वितरण. युनिसेफच्या जीवनरथ प्रकल्पाद्वारे स्थलांतरित कामगारांना मदत.
- कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्याचा गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा निर्णय.
२७ जून २०२०
- महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ५०४ गुन्हे दाखल, २६२ व्यक्तींना अटक.
- २२ मार्च ते २६ जून या कालावधीत १,३६,२६८ गुन्ह्यांची नोंद, २७,७२१ व्यक्तींना अटक. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाख ०३ हजार २ ७ ८ रुपयांचा दंड.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांची माहिती.
- कोविड-19 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना केल्या असल्यातरी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहनचालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही, त्यामुळे अशा कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन.
- वंदेभारत अभियानांतर्गत १४५ विमानांनी २२ हजार २५१ प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईच्या प्रवाशांची संख्या ८०७०, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ७६८६ आणि इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ६४९५.
- ५३१८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू, आज ४४३० रुग्णांची घरी रवानगी, घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- ८४ हजार २४५. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ टक्के, आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के.
- 1 जून ते 27 जूनपर्यंत 1 कोटी 40 लाख 18 हजार 770 शिधापत्रिका धारकांना 59 लाख 57 हजार 470 क्विंटल अन्नधान्य आणि 27 लाख 83 हजार 766 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती.
इतर निर्णय आणि घडामोडी
21 जून 2020
- शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांची औरंगाबाद येथे शेतकरी बणून दुकानांना भेट. खते शिल्लक असताना दुकानदाराने खरेदीस नकार दिल्यानंतर कृषी अधीक्षकांमार्फत संबंधित दुकान आणि गोदामाचा पंचनामा. औरंगाबाद कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश. खतांचा साठा मुबलक असताना जर दुकानदार कृषी निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश.
- राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
22 जून 2020
- उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष श्री अजित पवार यांनी, 23 जून या जागतिक ऑलिंपिक दिनाच्या निमित्त नागरिकांना शुभेच्छा.
- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्याद्वारे केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून लिलावाला विरोध. वन्यजीव कॉरिडॉरचा असा नाश योग्य नसल्याचे पत्रात नमूद.
२३ जून २०२०
- मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे श्री चव्हाण यांचे प्रतिपादन.
- गेल्या आठ महिन्यांपासून महावितरण कंपनीमध्ये विद्यूत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार जागांची प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया तातडीने सुरु करुन पुढील आठवड्यात या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याचे उर्जा मंत्री डॉ.नितिन राऊत यांचे आदेश.
- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात 29.53 चौ.कि.मी क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसूचना महसूल आणि वन विभागामार्फत प्रसिद्ध. क्षेत्र २९५३.३७७ हेक्टर किंवा २९.५३ चौ.कि.मी.
24 जून 2020
- सन २०१८-१९ साठीचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित.
- सन २०१८-१९ साठीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री श्रीमती मधुवंती दांडेकर यांना घोषित.
- मजूर सहकारी संस्थांच्या अडचणी
तातडीने सोडवण्याचे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांचे संबंधितांना निर्देश. महत्वाचे मुद्दे- मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा काम वाटपाची तीन लक्ष रुपयापर्यंतची मर्यादा वाढवा, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात सभासदांना मजूरीची रक्कम धनादेशाव्दारे वितरीत करा, कामांची रक्कम वर्षानुवर्षे प्रलंबित न ठेवता तातडीने अदा करण्याबाबत कार्यवाही करा. - राज्यातील मैदानांचा विकास करून तरुणांना सोईसुविधा उपलब्ध उपलब्ध करण्यासाठी समिती स्थापन करण्याची पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची घोषणा.
- देवभूमी विचार मंच उत्तराखण्ड व उत्तराखण्ड मुक्त विश्वविद्यालय, हल्दवानी, नैनीताल यांच्यामार्फत आयोजित “प्राचीन भारतीय साहित्यातील विज्ञान-तंत्रज्ञान व साथरोग विषयक संदर्भ” या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे (वेबिनार) राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फत उदघाटन.
- गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री संजय कुमार यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती.
- सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त, 1 जुलैपासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार.
- वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वनमंत्री श्री संजय राठोड यांच्यामार्फत महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा.
25 जून २०२०
- धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा पहिला विद्यार्थी दाखल, वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४६ जागांमध्ये वाढ.
- ज्या सरपंच व उपसरपंच यांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर नोंद केली नसेल त्यांनी या प्रणालीवर नोंद करण्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन. पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी 111 कोटी रुपये वितरीत.
मंत्रिमंडळ निर्णय
- राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास मान्यता. पायलट प्रोजेक्ट रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली ; रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनाऱ्यांवर राबवणार.
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनी आणि मालमत्तांचा पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी खाजगीकरणाच्या धोरणास मान्यता. पहिल्या टप्प्यात गणपतीपुळे, माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, मिठबाव येथील महामंडळाचे रिसॉर्ट तसेच ताडोबा आणि फर्दापूर (औरंगाबाद) येथील मोकळ्या जमिनींचा विकास.
- 30 जून २०२० रोजी संपुष्टात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहायभूत सेवा धोरण-2015 चा कालावधी नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत वाढविण्यास मान्यता.
- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारणा, मत्स्य आहार, बिगर शेती अवजारांसाठी करामध्ये सूट
- महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, 1975 (सुधारणा) अध्यादेशास मान्यता, ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी करु इच्छिणा-या कंपन्यांना व्यवसायकर कायद्यांतर्गत आपोआपच नोंदणी दाखला देण्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी मान्यता.
- किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत 2019-20 मधील खरीप पणन हंगाम व 2020-21 मधील रब्बी पणन हंगाम अंतर्गत वाहतूक करण्यात येणाऱ्या धान / सीएमआर (तांदूळ) साठी वाहतूक खर्च उपलब्ध करुन देण्यास मान्यता.
- निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागातील जिल्ह्यात बागायतींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने बागायतदारांचे उत्पनाचे स्त्रोत नष्ट झाल्याने अशा शेतकऱ्यांना पुनर्लागवडीसाठी रोजगार हमी योजनेमधून शासकीय अनुदान देण्याचा निर्णय.
- आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल रुपये 2 हजार, गट प्रवर्तकांना 3 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय. यासाठी 170 कोटी रुपये खर्चास मान्यता. 1 जुलै पासून वाढ लागू.
- नागभिड नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता शासनाचा सहभाग देण्याबाबत राज्याच्या आर्थिक सहभागास मान्यता.
- राज्यातील सीमा तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या आधुनिकीकरण व संगणकीकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक . सीमा तपासणी नाक्यासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश.
- भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील जवान सचिन विक्रम मोरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
२६ जून २०२०
- लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्फत महाराजांना अभिवादन आणि नागरिकांना सामाजिक न्याय दिवसाच्या शुभेच्छा.
- उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त युवा पिढिला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन आणि निरोगी, तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी शुभेच्छा.
- पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या तीनबाबिंना प्राधान्य देण्यासाठी कृषी दिनानिमित्ताने, ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय, याकाळात कृषीमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन.
२७ जून २०२०
- नागपूरला पर्यटनाचा हब बनविण्याची पालकमंत्री तथा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा, देशातील पथदर्शी “ऊर्जा शैक्षणिक पार्क” कोराडीत साकारणार, जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क, बिझनेस सेंटर आणि नवीन स्टेडियम प्रस्तावित.
- पुलवामा येथे शहीद झालेले सी.आर.पी.एफ.चे जवान सुनील दत्तात्रय काळे यांच्या पानगाव तालुका बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील घरी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यामार्फत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन.
- पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅबला) गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची भेट. गेल्या साठ वर्षांत या प्रयोगशाळेला भेट देणारे श्री देशमुख हे पहिले गृहमंत्री.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा