Gujarat board दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्हाचा आयुष काळे गुजरात बोर्डात गुणवत्ता यादीत

दहावीच्या परीक्षेत अकोला जिल्हाचा आयुष काळे गुजरात बोर्डात गुणवत्ता यादीत
                    आयुुष काळे


अकोला: गुजरात माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड गांधीनगर (गुजरात) यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीचा निकाल आज घोषित करण्यात आला असून अकोला जिल्हातील मुर्तीजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोनोरी (बापोरी) येथील  शामकुमार काळे यांचे चिरंजीव आयुष शामकुमार काळे याने इयत्ता १० वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्याला ९८.६४ टक्के गुण संपादन करून तो गुजरात बोर्डत गुणवत्ता यादीत तिसरा आला आहे. त्याने गुजराती, संस्कृत, समाजशास्त्र, गणित, विज्ञान या विषयामध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे. तो गुजरात येथील दीप दर्शन विद्यालय संकुल या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. विविध स्पर्ध्येमध्ये त्याने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. त्याचे वडील शामकुमार काळे यांचा गुजरात येथे साड्यांवर वर्क करण्याचा मोठा व्यवसाय आहे. त्याच्या या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात गोर गरीब नागरिकांची सेवा करण्यासाठी त्याने डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
.........

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा