Earth quake:भूकंप हिंगोलीत; अकोला शहराचा उल्लेखाने नागरिकांमध्ये भय

भूकंप हिंगोलीत; अकोला शहराचा उल्लेखाने नागरिकांमध्ये भय

अकोला,दि.२३: आधीच कोरोना विषाणूच्या थैमानामुळे अकोलेकर भीतीच्या सावटाखाली आहेत.त्यात मंगळवारी सायंकाळी भूकंप झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली,त्यामुळे नागरिकानी अजूनच धास्ती घेतली.यानंतर रात्री जिल्हाधिकारी यांनी अकोल्यात भूकंप झाल्याचे स्पष्ट केले. प्रसार माध्यमानी याआधारे भूकंपाची बातमी प्रसारित केली.मात्र,भूकंप अकोल्यापासून १२९ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगोली मधील गावामध्ये झाला असल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने घेतली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी कळमनुरी तालुक्यातील गव्हाण बोल्ड,वाडी पांगरा शिंदे येथे भूकम्पाचा सौम्य बसला. तीव्रता ३.३ रेक्टर स्केल एवढी असल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
अकोला शहरात भूकम्प झाल्याची बातमी सायंकाळी पसरल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण झाले होते. अकोला शहरापासून दक्षिण दिशेला १२९ कि. मी. क्षेत्रात भूकंपाचे झटकेमुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही,असे राष्ट्रीय भूकंप केंद्राने पुष्टी दिली.
अकोला पासून दक्षिण दिशेला १२९ कि. मी. अंतरावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे भूकम्पाचा धक्का बसला. परंतू, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने अकोल्यापासून दक्षिणेस उल्लेख केल्याने गोंधळ उडाला. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतू, अकोल्यात नसून हिंगोली मध्ये मंगळवारी सायंकाळी ५.२८ मि. ला भूकम्प झाल्याची नोंद NESC ने घेतल्याचे कळल्यावर अकोलेकरांना धीर मिळाला.
.........





टिप्पण्या