- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola:*आज 49 पॉझिटिव्ह!
कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि.१२ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१४४*
*पॉझिटीव्ह-४९*
*निगेटीव्ह-९५*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात २२ महिला व २७ पुरुषांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पूरपिडीत कॉलनी येथील नऊ, अकोट फैल येथील सात, शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन, मोठी उमरी येथील तीन, खदान येथील तीन, रेल्वे क्वार्टर येथिल तीन, गुलजार पुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथील दोन, पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर तारफैल, संतोषिमातामंदिर जवळ, छोटी उमरी, गितानगर, विजय नगर, शंकर नगर, भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल सायंकाळनंतर नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान काल (दि.११) रात्री एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेतांना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास दि. ७ जून रोजी दाखल करण्यात आले होते.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९६३*
*मयत-४४(४३+१),डिस्चार्ज-५८६*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३३*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा